संशयित वाहनांची तपासणी
By Admin | Published: February 16, 2017 03:24 AM2017-02-16T03:24:21+5:302017-02-16T03:24:21+5:30
तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाकडून संशयित वाहनांची कसून
पाईट : तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाकडून संशयित वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
तालुक्यात भरारी पथकाच्या माध्यमातून संभाव्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक गट आणि गणाचे नियोजन करून फ्लार्इंग स्कॉड, एसएसटी व शूटिंग स्कॉड अशी तीन प्रकारांत विभागणी केली आहे.
पिंपरी-पाईट जिल्हा परिषद गटामध्ये अशाच भरारीपथकाच्या माध्यमातून बुधवारी परिसरातील वाहनांची कडक तपासणी करण्यात येत होती. यामध्ये पथकप्रमुख आबंदे, रोडे, एस. बी. रमेश गुणे, प्रकाश आबेकर, गणपत भवारी, पोलीस हवालदार पाचपुते आदींच्या पथकाने परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नियोजन करत संशयास्पद वाहनांची चौकशी केली.
(वार्ताहर)