घातपात विरोधी तपासणी स्पर्धेत गुप्तवार्ता प्रबोधिनीचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 09:25 PM2018-11-01T21:25:00+5:302018-11-01T21:28:18+5:30

महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यातील विविध स्पर्धा विभागापैकी घातपात विरोधी तपासणी स्पर्धेत गुप्तवार्ता प्रबोधिनीचे वर्चस्व राहिले़.

Detective Conflict in Anti-Detection Competition | घातपात विरोधी तपासणी स्पर्धेत गुप्तवार्ता प्रबोधिनीचे वर्चस्व

घातपात विरोधी तपासणी स्पर्धेत गुप्तवार्ता प्रबोधिनीचे वर्चस्व

Next
ठळक मुद्देमेळाव्याचे औपचारिक उद्घाटन ३१ आॅक्टोबर रोजी पोलीस आयुक्त डॉ़.के़. व्यंकटेशम यांच्या हस्ते

पुणे : महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यातील विविध स्पर्धा विभागापैकी घातपात विरोधी तपासणी स्पर्धेत गुप्तवार्ता प्रबोधिनीचे वर्चस्व राहिले़. २९ आॅक्टोंबरपासून सुरु असलेल्या या मेळाव्याचे औपचारिक उद्घाटन ३१ आॅक्टोबर रोजी पोलीस आयुक्त डॉ़.के़. व्यंकटेशम यांच्या हस्ते करण्यात आले होते़. 
या मेळाव्यातील स्पर्धांचे निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आले़. (सुवर्ण, रौप्य आणि कास्य पदक विजेते)
संगणक सजगता : लेखी परीक्षा - १) - विजय कुंभार, सहायक पोलीस उपनिरीक्षक, बिनतारी संदेश विभाग, २) निखिल जाधव, पोलीस शिपाई, कोल्हापूर परिक्षेत्र, ३) विनोद नवले, पोलीस हवालदार, नवी मुंबई़ विज्ञानाची तपासात मदत : अंगुलीमुद्रा  परीक्षा अंतर्गत १)उमा बी. गावडे, पोलीस उप-निरीक्षक, ठाणे शहर, २) एल. देशमुख, पोलीस निरीक्षक, गु.अ.वि.,पुणे ३) नरेंद्र हिरवे, पोलीस निरीक्षक, नागपुर शहर 
आॅब्झरवेशन परीक्षा १) अतूल प्रकाश जाधव, पोलीस शिपाई, कोल्हापूर परीक्षेत्र, २) सतीश स्वामी, पोलीस नाईक, सोलापूर शहर ३) इक्बाल शेख, पोलीस पोर्टेट परीक्षा अंतर्गत १)अतूल जाधव, पोलीस शिपाई, कोल्हापूर परिक्षेत्र, २) राखी खवले, म.पो.ना., गु.अ.वि. पुणे, ३) सतीश स्वामी, पोलीस नाईक, सोलापूर शहऱ
घातपातविरोधी तपासणी या स्पर्धा प्रकारामधील रुम सर्च परीक्षा अंतर्गत १) अनिल साळुंखे, पोलीस शिपाई, महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी,पुणे, २)अमोल गवळी, पोलीस शिपाई, कोल्हापूर परिक्षेत्र ३) सदानंद अरोंदकर, पोलीस हवालदार, महाराष्ट्र गुप्तवात प्रबोधिनी,पुणे व हणमंत भोसले, पोलीस शिपाई, कोल्हापूर परीक्षेत्ऱ फोटोग्राफी परीक्षा अंतर्गत १) आर.के. खोपकर, सहा.पोलीस निरीक्षक, ठाणे परिक्षेत्र, २) राहूल खटाबकर, सहा पोलीस निरीक्षक, औरंगाबाद, ३)एच.एन.देवरे, पोलीस उप-निरीक्षक, नाशिक शहऱ व्हेईकल सर्च परीक्षा अंतर्गत १)बंडू नवथर, पोलीस नाईक, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी,पुणे, २) अमोल घोरपडे, पोलीस हवालदार, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी,पुणे ३) शशीकांत एस. गाडेकर, पोलीस नाईक, रा.रा.पो.बल रेंज़ 
 महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीचे संचालक आर डी शिंदे, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक २ चे समादेशक आऱ. डी़. शिंदे यांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार करण्यात आला़. यावेळी गुन्हे अन्वेषणचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ़. जय जाधव, पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते़. 

Web Title: Detective Conflict in Anti-Detection Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.