जेजुरी रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे डबे घसरल्याने खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 07:24 PM2018-03-26T19:24:51+5:302018-03-26T19:24:51+5:30

कोल्हापुरहून पुण्याकडे येणाऱ्या मालगाडीचे नऊ रिकामे डबे सोमवारी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास जेजुरी ते दौंडजदरम्यान रुळावरून घसरले.

Detention Due to passenger Coaches collapse near Jejuri Railway Station | जेजुरी रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे डबे घसरल्याने खोळंबा

जेजुरी रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे डबे घसरल्याने खोळंबा

googlenewsNext
ठळक मुद्देमंगळवारी २७ मार्च रोजी ही गाडी कोल्हापुर ते पुण्यापर्यंत रद्द

पुणे : जेजुरी रेल्वे स्थानकाजवळ रूळावरून मालगाडीचे डबे घसरल्याने सोमवारी या मार्गे जाणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्यांचा खोळंबा झाला. काही गाड्या रद्द कराव्या लागल्या असून काही गाड्यांना दौंडमार्गे वळविण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. 
कोल्हापुरहून पुण्याकडे येणाऱ्या मालगाडीचे नऊ रिकामे डबे सोमवारी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास जेजुरी ते दौंडजदरम्यान रुळावरून घसरले. रेल्वेकडून तातडीने रुळावरून डबे हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र, या घटनेमुळे या मार्गावरून जाणाऱ्या काही गाड्या रद्द कराव्या लागल्या. तर काही गाड्या अन्य मार्गाने वळविण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मुंबई-कोल्हापुर सह्याद्री एक्सप्रेस पुण्यापर्यंत सोडण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवारी २७ मार्च रोजी ही गाडी कोल्हापुर ते पुण्यापर्यंत रद्द करण्यात आली असून पुण्यातून मुंबईकडे नियमित वेळेनुसार सोडण्यात येईल.
----------------
रद्द करण्यात आलेल्या रेल्वेगाड्या -
१. पुणे - सातारा पॅसेंजर 
२. कोल्हापुर-मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस
३. मुंबई -कोल्हापुर महालक्ष्मी एक्सप्रेस (दि. २७ मार्च)
---------------
मिरज-कुर्डूवाडी-दौंड-पुणेमार्गे वळविण्यात आलेल्या गाड्या -
१. बेंगलुरू-भगत की कोठी जोधपुर एक्सप्रेस 
२. कोल्हापुर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस
३. पदुचेरी-दादर एक्सप्रेस
४. हजरत निझामुद्दीन वास्को-द-गामा गोवा एक्सप्रेस
-----------

Web Title: Detention Due to passenger Coaches collapse near Jejuri Railway Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.