खटला रद्द करण्यासाठी लाच स्वीकारलेल्या बडतर्फ पोलीस निरीक्षकाला कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:11 AM2021-03-24T04:11:44+5:302021-03-24T04:11:44+5:30
१३ जानेवारीला किवळे, ता. हवेली येथे ही घटना घडली होती. वडगाव मावळ तालुक्यातील इंदुरी येथील ३२ वर्षीय व्यक्तीने याबाबत ...
१३ जानेवारीला किवळे, ता. हवेली येथे ही घटना घडली होती. वडगाव मावळ तालुक्यातील इंदुरी येथील ३२ वर्षीय व्यक्तीने याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कडजई माता दूध संकलन मंडळाचे अध्यक्ष आहेत. दूध संकलन करून अमोल डेअरीला घालण्यात येत असत. फिर्यादी आणि भावाच्याविरोधात अमोल डेअरीने केस दाखल केली आहे. तुम्हाला आणि भावाला अटक होणार आहे. ही केस रद्द करण्यासाठी न्यायाधीश आपल्या बाजूने करण्यासाठी लाच मागितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणात ५० हजार रुपये स्वीकारलेल्या शुभावरी गायकवाड व जाधव यांमध्ये ४७ वेळा मोबाइलद्वारे संपर्क झाला आहे. शुभावरी गायकवाड यांना जामीन मंजूर झाला आहे. तर सुशांत केंजळे हा न्यायालयीन कोठडीत असून अर्चना जतकर व अजय गोपीनाथन यांचा पोलीस शोध घेत आहे. या प्रकरणात जाधव याला अटक करत न्यायालयात हजर करण्यात आले. शुभावरीसह सुशांत याबरोबरही जाधव याचे ३३ कॉल झाले आहेत. तसेच, या गुन्ह्यात फरार असलेल्या अर्चना जतकर यांच्याशी २४ वेळा मोबाइलवरून संपर्क झाला आहे. या गुन्ह्यात वापरण्यात आलेला मोबाइल जप्त करायचा असून आरोपीने संबंधितांना कशासाठी संपर्क केला होता. याचा तपास करायचा असल्याने त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी अॅड. राजेश कावेडिया यांनी युक्तिवादादरम्यान केली.