लिफ्टच्या डक्टमध्ये पडून कामगाराचा मृत्यू
By Admin | Published: March 20, 2017 04:40 AM2017-03-20T04:40:16+5:302017-03-20T04:40:16+5:30
बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या लिफ्टच्या डक्टमध्ये पडून महिला मजूर मृत्यूमुखी पडली. ही घटना शुक्रवारी सकाळी अकराच्या
पुणे : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या लिफ्टच्या डक्टमध्ये पडून महिला मजूर मृत्यूमुखी पडली. ही घटना शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास उंड्री पिसोळीतील ‘गगन लॅव्हीशा’ या सोसायटीमध्ये घडली. या संदर्भात कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नागम्मा सायबन्ना पुजारी असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी साईट व्यवस्थापक संतोष देशपांडे, सेंट्रीग ठेकेदार बाबूराव ढोरे, लिफ्ट आॅपरेटर शिवाप्पा यशवंत गोडवळे या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंड्रीमध्ये गगन लॅव्हीशा या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या साईटवर पुजारी या काम करीत होत्या. काम करताना त्यांना सुरक्षेसाठी हेल्मेट, सेफ्टीबेल्ट, जाळी आदी सुरक्षासाधने पुरवण्यात आलेली नव्हती. लिफ्टसाठीच्या डक्टवर झाकण लावून ते झाकण्यात आलेले नव्हते. काम करीत असताना तोल जाऊन त्या लिफ्टच्या डक्टमध्ये पडल्या. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. (प्रतिनिधी)