इंदापूर येथे ‘माझी वसुंधरा’ अंतर्गत दीड हजार वृक्षारोपण करण्याचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:15 AM2021-09-09T04:15:12+5:302021-09-09T04:15:12+5:30

इंदापूर : इंदापूर नगर परिषदेच्या माझी वसुंधरा २.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुराबाई ...

Determination to plant one and a half thousand trees under 'My Earth' at Indapur | इंदापूर येथे ‘माझी वसुंधरा’ अंतर्गत दीड हजार वृक्षारोपण करण्याचा संकल्प

इंदापूर येथे ‘माझी वसुंधरा’ अंतर्गत दीड हजार वृक्षारोपण करण्याचा संकल्प

googlenewsNext

इंदापूर : इंदापूर नगर परिषदेच्या माझी वसुंधरा २.० व स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुराबाई श्रीपती विद्यालयाने स्पर्धेत सहभाग नोंदवला. शाळेच्या सन १९८९ च्या दहावीच्या बॅचचे संदीप शिंदे, सुरेखा कुठे ( गवारे ) आप्पासाहेब पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त त्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी दीड हजार झाडे लावण्याचा व तो जोपासण्याचा संकल्प केला.

बुधवार ( दि. ८ ) रोजी सकाळी विविध ३०० वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये १०० करंज, १०० सिसम व १०० बीटीची झाडे लावण्यात आली. त्याचबरोबर झाडांना पाण्याचा पुरवठा होण्यासाठी ड्रीप पाइपलाइनही करण्यात आली. यावेळी तरी नगर परिषदेच्या कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष अंकिता मुकुंद शहा व मुख्याधिकारी राम राजे कापरे, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, नगरसेवक कैलास कदम, प्रा. सुनील मोहिते, विठ्ठलराव ननवरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्ष अंकिता मुकुंद शहा म्हणाल्या की, इंदापूर शहरातील नागरिकांनी व विविध संस्थांनी सदर उपक्रमात आपला खारीचा वाटा द्यावा. शहर हरित, स्वच्छ सुंदर ठेवण्यात योगदान द्यावे. आपल्या शहराची प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी आपण सर्वांनी या अभियानात सहभागी होऊन शहराच्या नावलौकिकात भर पाडावी, असे आवाहन नगराध्यक्ष अंकिता शहा यांनी केले.

यावेळी जन्मदिवस असणाऱ्या सत्कारमूर्ती व नगरपालिकेच्या स्पर्धेत भाग घेतलेल्या नागरिकांचा नगरपालिकेच्यावतीने सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला, तसेच १९८९ च्या बॅचने झाडे संवर्धन व संगोपन करण्याची हमी नगर परिषदेस दिली व ‘माझी वसुंधरा’ची शपथ त्यांनी घेतली.

फोटो ओळ : इंदापूर येथे वृक्षारोपण करून, हमीपत्र नगराध्यक्ष अंकिता शहा यांच्याकडे देण्यात आले.

Web Title: Determination to plant one and a half thousand trees under 'My Earth' at Indapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.