देऊळगावराजेला भारनियमन कमी
By admin | Published: June 14, 2014 02:13 AM2014-06-14T02:13:06+5:302014-06-14T02:13:06+5:30
देऊळगावराजे (ता. दौंड) परिसरात भारनियमन कमी करावे, अशी मागणी जनसेवा युवा विकास आघाडीचे कार्याध्यक्ष प्रशांत गिरमकर यांनी विद्युत महावितरण कंपनीकडे केली आहे
देऊळगावराजे : देऊळगावराजे (ता. दौंड) परिसरात भारनियमन कमी करावे, अशी मागणी जनसेवा युवा विकास आघाडीचे कार्याध्यक्ष प्रशांत गिरमकर यांनी विद्युत महावितरण कंपनीकडे केली आहे.
दरम्यान या भागात देखरेखीसाठी स्वतंत्र विजेचे विद्युत कार्यालय सुरु करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. देऊळगावराजेला विद्युत वितरण कंपनीचे सबस्टेशन असून त्याच्या अंतर्गत देऊळगावराजे, वडगावदरेकर, शिरापूर, पेडगाव, हिंगणीबेर्डी, ज्योतिबानगर असा परिसर
समाविष्ट आहे.
मात्र, या भागांचा विचार करता, या सबस्टेशनला फक्त दोनच अधिकृत वायरमन आहेत. त्यामुळे त्यांना काम करताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना विद्युत रोहित्रातील छोटेमोेठे बिघाड काढणे, जम टाकणे यासाठी छोटीमोठी कामे करणे यासाठी जिवाला धोका होणारी कामे करावी लागतात. परिणामी या भागात वायरमनची संख्या वाढविणे गरजेचे आहे. सध्याच्या परिस्थितीत वाढलेल्या भारनियमनामुळे येथील शेतकरी आणि जनता त्रस्त झाले आहेत. तेव्हा या भागातील भारनियमन थांबवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.(वार्ताहर)