देव जावीया, पारस दहिया यांचा दुसºया फेरीत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:11 AM2021-03-24T04:11:18+5:302021-03-24T04:11:18+5:30
पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) व डेक्कन जिमखाना यांच्या संलग्नतेने आयोजित केपीआयटी-एमएसएलटीए आयटीएफ डब्लूटीटी कप ...
पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) व डेक्कन जिमखाना यांच्या संलग्नतेने आयोजित केपीआयटी-एमएसएलटीए आयटीएफ डब्लूटीटी कप पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीच्या पहिल्या फेरीत क्वालिफायर पारस दहिया, देव जावीया या भारतीय खेळाडूंनी दुसºया फेरीत प्रवेश केला. तर, आर्यन गोवीस, करण सिंग यांचे आव्हान संपुष्टात आले. दुहेरीत फैजल कुमार व ध्रुव सुनीश यांनी अव्वल मानांकित जोडीवर सनसनाटी विजय मिळवत आजचा दिवस गाजवला.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीत पहिल्या फेरीत स्वीडनच्या पाचव्या मानांकित जोनाथन म्रिधा याने भारताच्या आर्यन गोवीसचा टायब्रेकमध्ये ७-६(३), ७-५ असा पराभव केला. हा सामना २ तास ३० मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये पहिल्याच गेममध्ये आर्यनने जोनाथनची, तर दुसºया गेममध्ये जोनाथनने आर्यनची सर्व्हिस ब्रेक केली. त्यानंतर बाराव्या गेमपर्यंत दोन्ही खेळाडूंनी जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले व हा सेट टायब्रेकमध्ये गेला.
टायब्रेकमध्ये जोनाथनने जोरदार खेळ करत आर्यनविरुद्ध हा सेट ७-६ (३) असा जिंकला. दुसºया सेटमध्ये पिछाडीवर असलेल्या आर्यनने आपल्या खेळात नवीन रणनीती आखत दुसºया गेममध्ये जोनाथनची सर्व्हिस भेदली व सामन्यात २-० अशी आघाडी घेतली. पण ही आघाडी आर्यनला फार काळ टिकविता आली नाही. पुढच्याच गेममध्ये जोनाथनने आर्यनची सर्व्हिस रोखली व आघाडी २-१ कमी केली. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी सावध खेळ केला व सामन्यात ५-५ अशी बरोबरी निर्माण झाली. अखेर जोनाथनने अकराव्या गेममध्ये आर्यनची सर्व्हिस ब्रेक केली व स्वत:ची सर्व्हिस राखत हा सेट ७-५ असा जिंकून विजय मिळवला.
पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या भारताच्या पारस दहिया याने क्वालिफायर सूरज आर प्रबोधचा ६-२, ७-६ (१०) असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. भारताच्या देव जाविया याने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या साई कार्तिक रेड्डी गंताचे आव्हान ७-६ (२), ६-४ असे मोडीत काढले. स्वीडनच्या फिलीप बगेर्वी याने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या करण सिंगला ६-२,७-५ असे पराभूत केले. चुरशीच्या लढतीत हंगेरीच्या झोंबोर वेल्ज याने इटलीच्या मार्को बृगेनरोटोचा ४-६, ६-४, ७-५ असा तीन सेटमध्ये पराभव करून दुसºया फेरीत प्रवेश केला. अन्य लढतीत भारताच्या निकी पोनाच्चा कलियांदा हा पहिला सेट ६-१ असा पराभूत झाल्यानंतर त्याच्या मनगटाला दुखापत झाल्यामुळे त्याने सामना सोडून दिला व त्यामुळे क्वालिफायर ग्रेट ब्रिटनच्या हेनरी पॅटन पुढे चाल देण्यात आली.
दुहेरीत पहिल्या फेरीत फैजल कुमार व ध्रुव सुनीश या जोडीने अव्वल मानांकित एन विजय सुंदर प्रशांत व विष्णू वर्धन या जोडीचा ६-४, ३-६, १०-६ असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. याआधी स्पर्धेचे उद्घाटन भारताची अव्वल मानांकित टेनिसपटू अंकिता रैना, एमएसएलटीएचे आजीव उपाध्यक्ष आनंद तुळपुळे, डेक्कन जिमखानाचे प्रमोद बाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डेक्कन जिमखानाच्या टेनिस विभागाचे सचिव व स्पधेर्चे सहसंचालक आश्विन गिरमे, आयटीएफ सुपरवायझर शितल अय्यर मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल : पहिली (मुख्य ड्रॉ) फेरी : पुरुष गट :
हेनरी पॅटन (ग्रेट ब्रिटन) वि.वि.निकी पोनाच्चा कलियांदा(भारत) ६-१ सामना सोडून दिला;
झोंबोर वेल्ज(हंगेरी) वि. वि. मार्को बृगेनरोटो(इटली) ४-६, ६-४, ७-५;
देव जाविया (भारत) वि.वि. साई कार्तिक रेड्डी गंता (भारत) ७-६ (२), ६-४;
पारस दहिया (भारत) वि.वि. सूरज आर प्रबोध (भारत) ६-२, ७-६ (१०);
जोनाथन म्रिधा(स्वीडन) [५] वि.वि. आर्यन गोवीस (भारत) ७-६ (३), ७-५;
फिलीप बगेर्वी (स्वीडन) वि.वि. करण सिंग (भारत) ६-२, ७-५;
दुहेरी गट : पहिली फेरी :
फैजल कुमार (भारत)/ ध्रुव सुनीश (भारत) वि.वि. एन विजय सुंदर प्रशांत (भारत)/विष्णू वर्धन (भारत) [१] ६-४, ३-६, १०-६;
झेन खान (अमेरिका)/ दलिबोर सेव्हर्सिना (चेक प्रजासत्ताक) वि.वि. सिद्धार्थ रावत(भारत) / मनीष सुरेशकुमार (भारत) २-६, ६-३, १०-३;
लुका कॅस्टेलनुव्हो (स्वित्झर्लंड)//अर्जुन कढे (भारत) [२] वि.वि. एडन म्यूकुक(ग्रेट ब्रिटन)/डोमिनिक पलन((चेक प्रजासत्ताक) ४-६, ७-५, १०-२;
एस डी प्रज्वल देव (भारत)/ नितीन कुमार सिन्हा (भारत) वि.वि. ऋषी रेड्डी(भारत)/ अभिनव शाण्मुगम (भारत) (४) ६-७, ६-०, १०-३.