देवदत्त कुमारचा साईराज श्रोत्रीवर सनसनाटी विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:11 AM2021-03-26T04:11:54+5:302021-03-26T04:11:54+5:30

पुणे : पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या संलग्नतेने १४ वर्षांखालील मुले व मुलींच्या गटातील सहाव्या ...

Devdutt Kumar's sensational victory over Sairaj Shrotri | देवदत्त कुमारचा साईराज श्रोत्रीवर सनसनाटी विजय

देवदत्त कुमारचा साईराज श्रोत्रीवर सनसनाटी विजय

googlenewsNext

पुणे : पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या संलग्नतेने १४ वर्षांखालील मुले व मुलींच्या गटातील सहाव्या पीएमडीटीए-केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात बिगरमानांकित देवदत्त कुमारने सहाव्या मानांकित साईराज श्रोत्रीवर ६-२ असा विजय मिळवत दिवस गाजवला. त्याचप्रमाणे अर्जुन कीर्तन, श्रीया होनकर यांनीही विजय साकारले.

स्वराज्यरक्षक संभाजी महाराज क्रीडा संकुल, कर्वेनगर या ठिकाणी सुरू असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत मुलांच्या गटात अव्वल मानांकित नीव कोठारीने कौशिक कचरेचा टायब्रेकमध्ये ६-५ (५) असा, तर दुसऱ्या मानांकित अर्जुन कीर्तने याने रोहित साठेचा ६-० असा एकतर्फी पराभव करून आगेकूच केली. तिसऱ्या मानांकित अवनीश चाफळेने राज दर्डाला ६-१ असे नमविले.

मुलींच्या गटात दुसऱ्या फेरीत उर्वी काटे, श्रीया होनकन, निशिता देसाई, रिशीता पाटील, श्रावणी देशमुख, रितिका मोरे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल : दुसरी फेरी : मुले :

नीव कोठारी(१) वि.वि. कौशिक कचरे ६-५ (५); अथर्व जोशी (५) वि.वि. सोहम गुंजाळ ६-२; अवनीश चाफळे (३) वि.वि.राज दर्डा ६-१; देवदत्त कुमार वि.वि.साईराज श्रोत्री(६) ६-२; विश्वजीत सणस(४) वि.वि. सिद्धांत कुलकर्णी ६-३; अर्जुन कीर्तने (२) वि.वि. रोहित साठे ६-०;

मुली : दुसरी फेरी : उर्वी काटे(१) वि.वि. देदित्या जैन ६-१; श्रीया होनकन वि.वि. नैशा कपूर ६-४; निशिता देसाई वि.वि. आर्या गौतम ६-५ (४); रिशीता पाटील वि.वि. अंजली निंबाळकर ६-४; श्रावणी देशमुख वि.वि. आदिश्री जोशी ६-१; रितिका मोरे वि.वि.आस्मि मोरे ६-०.

फोटो - अर्जुन कीर्तन, श्रीया होनकर

----------------------------------------------

Web Title: Devdutt Kumar's sensational victory over Sairaj Shrotri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.