पुणे स्टेशनला पर्याय म्हणून खडकी स्टेशनचा विकास करा; खासदार गिरीश बापटांची मागणी

By नितीश गोवंडे | Published: September 21, 2022 05:59 PM2022-09-21T17:59:58+5:302022-09-21T18:04:45+5:30

खासदार बापट म्हणाले, पर्यायी व्यवस्था म्हणून खडकी रेल्वे स्टेशनचा टर्मिनल म्हणून विकास करावा

Develop Khadki station as an alternative to Pune station said mp Girish Bapat | पुणे स्टेशनला पर्याय म्हणून खडकी स्टेशनचा विकास करा; खासदार गिरीश बापटांची मागणी

पुणे स्टेशनला पर्याय म्हणून खडकी स्टेशनचा विकास करा; खासदार गिरीश बापटांची मागणी

Next

पुणे : शहरासह उपनगरे देखील झपाट्याने विकसित होत असून, नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी पुणे स्टेशनलाच यावे लागते. तसेच या रेल्वे स्थानकावर प्रचंड ताण देखील येत असल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून खडकी रेल्वे स्टेशनचा टर्मिनल म्हणून विकास करावा अशा सूचना खासदार गिरीश बापट यांनी पुणे रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

मंगळवारी (२० सप्टेंबर) रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह झालेल्या बैठकीत, पुणे स्टेशनवर ताण पडत असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडीसह रेल्वे व पोलिस प्रशासनावर ताण, तसेच नागरिकांना देखील आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच भविष्यातही पुणे स्टेशनवरील हा ताण वाढतच राहणार असल्याने पुणे रेल्वे स्टेशनला शहरातच पर्यायी व्यवस्था म्हणून खडकी रेल्वे स्टेशनला टर्मिनल म्हणून विकसित केल्यास पुणे स्टेशनवरील ताण कमी होईल असे बापट यांनी सांगितले.

याव्यतिरिक्त शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विचार केला तर खासगी वाहनांनी रेल्वे स्टेशनवर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने शहरातील पुणे व इतर रेल्वे स्टेशनवर वाहनतळाची पुरेशी व्यवस्था नसल्याने रेल्वेने याबाबत तातडीने उपाययोजना करावी. हडपसर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, रस्ते विकसित करावे, रेल्वेने येणाऱ्या व इतर प्रवाशांसाठी पीएमपीएमएल बस व्यवस्था सुरु करावी, रेल्वे स्टेशन पार्किंग (महात्मा गांधी पुतळा) ते ताडीवाला रस्ता स्ट्रॉम वॉटर लाइनचा विकास करण्यासाठी रेल्वेने परवानगी द्यावी, पुणे कँटोन्मेंट कार्यक्षेत्रातील मिरज रेल्वे लाईनवर घोरपडी परिसरात आरओबी बांधण्यासाठी रेल्वेची जमीन महानगरपालिकेला हस्तांतरित करावी या विषयांवर या बैठकीत चर्चा झाल्याचे बापट यांनी सांगितले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह रेल्वेचे इतर अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Develop Khadki station as an alternative to Pune station said mp Girish Bapat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.