कोरोनाचा नेमका प्रकार ओळखण्यासाठी चाचणीसंच विकसित; पुण्याच्या 'या' संस्थेला ICMR चीही मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 07:14 PM2021-12-17T19:14:10+5:302021-12-17T19:14:28+5:30

पुण्यातील जीनपॅथ डायग्नोस्टिक्सच्या वतीने कोविड १९ च्या डेल्टा व ओमिक्रॉन प्रकारातील फरक ओळखण्यासाठी ‘कोविडेल्टा’ हा भारतीय बनावटीचा चाचणीसंच (टेस्ट किट) विकसित करण्यात आला असून या एकाच चाचणीद्वारे कोविड विषाणूचा नेमका प्रकार ओळखणे, आता शक्य झाले आहे.

Developed a test kit to identify the exact type of corona Recognition of icmr to organization of Pune | कोरोनाचा नेमका प्रकार ओळखण्यासाठी चाचणीसंच विकसित; पुण्याच्या 'या' संस्थेला ICMR चीही मान्यता

कोरोनाचा नेमका प्रकार ओळखण्यासाठी चाचणीसंच विकसित; पुण्याच्या 'या' संस्थेला ICMR चीही मान्यता

Next

पुणे : पुण्यातील जीनपॅथ डायग्नोस्टिक्सच्या वतीने कोविड १९ च्या डेल्टा व ओमायक्रॉन प्रकारातील फरक ओळखण्यासाठी ‘कोविडेल्टा’ हा भारतीय बनावटीचा चाचणीसंच (टेस्ट किट) विकसित करण्यात आला असून या एकाच चाचणीद्वारे कोविड विषाणूचा नेमका प्रकार ओळखणे, आता शक्य झाले आहे.

या संशोधनाद्वारे कोविड १९ या संसर्गजन्य रोगाचा नेमका प्रकार ओळखणे सोपे झाले असून अशाच अचूक व अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत चाचण्या उपलब्ध करण्याचा आमचा उद्देश असल्याचे सांगत जीनपॅथ डायग्नोस्टिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल जकातदार म्हणाले, “या चाचणीसंचाच्या मदतीने जगभरात सध्या धुमाकूळ घालत असलेल्या कोविड १९ च्या डेल्टा व ओमायक्रॉन सोबतच या विषाणूच्या इतर प्रकारांची ओळख पटविणे शक्य झाले आहे. सदर चाचणीसंच हा संपूर्णपणे भारतीय बनावटीचा असून याद्वारे अगदी कमी वेळेमध्ये विषाणूच्या प्रकाराबद्दल माहिती मिळते. शिवाय हा चाचणीसंच कमी दरात उपलब्ध करून देण्यात आला असून इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरची मान्यता देखील त्याला मिळाली आहे.”      

जीनपॅथ डायग्नोस्टिक्सचे संस्थापक आणि चीफ सायंटिफिक ऑफिसर डॉ. निखिल फडके म्हणाले, “या चाचणीसंचाच्या मदतीने पुण्यातील कोविड १९च्या ओमिक्रॉन प्रकाराचा पहिला बाधित रुग्ण आम्ही दाखवून देऊ शकलो. इतकेच नव्हे तर पुढे सदर रुग्ण हा ओमिक्रॉन प्रकारानेच बाधित असल्याची पुष्टी पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल), आयसर,बी.जे. मेडिकल कॉलेज व पूना नॉलेज क्लस्टर (पीकेसी) सारख्या भारतीय SARS-CoV-2 जीनोमिक्स (INSACOG) कन्सोर्शीयम अंतर्गत येणा-या संस्थांनी देखील केली. सध्या भारतातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक सरकारी आणि खाजगी संस्था या कोविड विषाणूच्या प्रकारांच्या निदानासाठी व त्यांवर लक्ष ठेवण्यासाठी या चाचणीसंचाच्या वापराचे मूल्यांकन करत आहेत.”

भविष्यातही डेल्टा व ओमायक्रॉनचे उपप्रकार ओळखण्यास  ‘कोविडेल्टा’ मदतशीर ठरणार 

या चाचणीसंचाचे वैशिष्ट्य म्हणजे याद्वारे सध्या वेगाने पसरत असलेल्या डेल्टा प्रकारातील बीए १ व बीए २ सोबत नवीन येत असलेला बीए ३ आणि ओमायक्रॉन या विषाणूच्या प्रकारातील ठळक फरक ओळखता येतो. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व कॅनडा या देशांमध्ये नुकत्याच आढळून आलेल्या रुग्णसंख्येत ७०% रुग्ण हे बीए २ या उपप्रकारातील असून त्यांना एसजीटीएफ चाचणीमध्ये या विषाणू प्रकाराची ओळख पटविण्यास यश आले नाही. मात्र जीनपॅथतर्फे विकसित व आयसीएमआर मान्यताप्राप्त ‘कोविडेल्टा’ या चाचणीसंचात डेल्टा प्रकारात आढळून येणारे मात्र ओमायक्रॉन प्रकारात आढळून न येणारे L452R हे उत्परिवर्तन लक्षात येते. यामुळे सध्या व भविष्यात विषाणू आणि त्याच्या उपप्रकारात होणारे बदल ओळखत डेल्टा व ओमायक्रॉन प्रकारातील फरक समोर आणण्यास ‘कोविडेल्टा’ मदतशीर ठरेल, असेही डॉ. फडके यांनी सांगितले.  

Web Title: Developed a test kit to identify the exact type of corona Recognition of icmr to organization of Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.