दिव्यांगांसाठी दिशा कौशल्य विकासाची; पुण्यात दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:01 PM2018-02-13T12:01:23+5:302018-02-13T12:04:59+5:30

अपंग कल्याण आयुक्तालय, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी आणि महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाच्या वतीने येत्या १५ व १६ फेब्रुवारी रोजी ‘दिव्यांगांसाठी दिशा कौशल्य विकासाची’या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

Development of direction skills for the Divyang; Two-day training program in Pune | दिव्यांगांसाठी दिशा कौशल्य विकासाची; पुण्यात दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम

दिव्यांगांसाठी दिशा कौशल्य विकासाची; पुण्यात दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम

Next
ठळक मुद्देदिव्यांग व्यक्ती समाजाच्या मूळ प्रवाहत कशा येऊ शकतात याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शनदिव्यांगासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थासह विविध कंपन्यांचे उभे केले जाणार स्टॉल

पुणे : अपंग कल्याण आयुक्तालय, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी आणि महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाच्या वतीने येत्या १५ व १६ फेब्रुवारी रोजी ‘दिव्यांगांसाठी दिशा कौशल्य विकासाची’या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. अल्प बचत भवन येथे सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत या कार्यशाळेत दिव्यांग व्यक्तींनी त्यांच्यामध्ये असलेल्या कौशल्यांचा विकास कसा करावा, याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
दिव्यांग व्यक्तींना उद्योग, व्यावसाय करायचा असल्यास भागभांडवल कसे उपलब्ध करता येते. कौशल्य विकास अभ्यासक्रम पूर्ण केल्याने कोणत्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी प्राप्त होतात. तसेच दिव्यांग व्यक्ती समाजाच्या मूळ प्रवाहत कशा येऊ शकतात याबाबत कार्यशाळेत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल आहे, असे अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कार्यशाळेत दिव्यांगासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थासह विविध उद्योगिक कंपन्यांचे स्टॉल उभे केले जाणार आहेत. कार्यशाळेच्या उद्घाटनास सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, पालकमंत्री गिरीश बापट, विभागाचे सचिव दिनेश वाघमारे उपस्थित राहणार आहेत, असेही पाटील म्हणाले.

Web Title: Development of direction skills for the Divyang; Two-day training program in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.