आमदार निधीशिवाय वडगावशेरी मतदार संघात 50 कोटींचा विकास निधी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 07:54 PM2021-12-07T19:54:57+5:302021-12-07T19:58:41+5:30

आमदार टिंगरे यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून पुण्यात सर्वाधिक निधी त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी आणला आहे...

development fund 50 crore in wadgaon sheri constituency without mla fund | आमदार निधीशिवाय वडगावशेरी मतदार संघात 50 कोटींचा विकास निधी

आमदार निधीशिवाय वडगावशेरी मतदार संघात 50 कोटींचा विकास निधी

googlenewsNext

पुणे : राज्यात सत्ता असल्याने वडगावशेरी मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल टिंगरे (sunil tingare) यांनी आतापर्यंत आमदार निधीशिवाय तब्बल 50 कोटींना विकास निधी मिळविण्यात यश आले आहे. शहरामध्ये असा विशेष व ठोस निधी मिळविण्यात टिंगरे आघाडीवर आहेत. तर आमदार निधी शंभर टक्के खर्च खर्चण्याचे नियोजन पूर्ण केले असून, मार्च अखेर पर्यंत सर्व निधी खर्च होणार असल्याचे टिंगरे यांनी स्पष्ट केले.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. पुण्यात आघाडी सरकारचे दोन आमदार आहेत. त्यामुळे आमदार टिंगरे यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून पुण्यात सर्वाधिक निधी त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी आणला आहे. या मध्ये नगरविकास खात्याच्या माध्यमातून 20 कोटींचा सर्वाधिक निधी मिळाला आहे. त्यात 17 कोटींचा निधी हा रस्ते आणि ड्रेनेजच्या कामांसाठी तर 3 कोटींचा निधी विद्युत  कामांसाठी मिळाला आहे. तर जिल्हा वार्षीक योजनेच्या माध्यमातून चालू आणि गत आर्थिक वर्षातील अशी एकूण 7 कोटी 72 लाखांची कामे मंजूर झाली आहेत.

ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून मतदारसंघात मांजरी, वडगाव शिंदे आणि निरगुडी या तीन गावांसाठी 1 कोटीचा स्वतंत्र निधी मंजूर झाला आहे. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सुधारणा योजनेंतर्गत 1 कोटींचा निधी मिळाला आहे. या शिवाय नाबार्ड योजनेंतर्गत लोहगाव - वडगाव शिंदे पूल बांधण्यासाठी दीड कोटी, लोहगाव-वाघोली रस्त्यासाठी  साडेचार कोटी, मांजरी- कोलवडी रस्त्यासाठी 1 कोटी 80 लाख , प्रमुख जिल्हा मार्ग योजनेंतर्गत हडपसर - मांजरी रस्त्यासाठी 2 कोटी आणि राष्ट्रीय मार्ग योजनेंतर्गत मुंढवा- केशवंनगर - कोलवडी रस्त्यासाठी चार कोटींचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार टिंगरे यांनी दिली.

सर्वाधिक निधी लोहगावला
लोहगावचा पुणे महापालिकेत समावेश झाला असला तरी या गावांसाठी पुरेसा निधी महापालिकेने दिलेला नाही. त्यामुळे आमदार टिंगरे यांनी 7 कोटींचा सर्वाधिक निधी लोहगावला दिला आहे. तर मांजरी खुर्दला 4 कोटी 75 लाख, निरगुडी गावाला 2 कोटी 25 लाख आणि वडगाव शिंदे 2 कोटी 68 लाख इतका निधी विविध विकासकांमासाठी दिला असून,  उर्वरित 35 हुन अधिक कोटींचा निधी वडगाव शेरीतील मतदारसंघातील पालिका हद्दीतील कामांसाठी दिला आहे.

Web Title: development fund 50 crore in wadgaon sheri constituency without mla fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.