मराठवाड्याचा करणार विकास
By admin | Published: January 10, 2017 02:57 AM2017-01-10T02:57:29+5:302017-01-10T02:57:29+5:30
अविकसित, मागासलेला, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा मराठवाडा अशी ओळख मागील पंधरा वर्षांत आघाडी सरकारने दिली. ते पुसण्याचे काम भाजपा सरकार करेल
रहाटणी : अविकसित, मागासलेला, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा मराठवाडा अशी ओळख मागील पंधरा वर्षांत आघाडी सरकारने दिली. ते पुसण्याचे काम भाजपा सरकार करेल. केंद्र आणि राज्य सरकारने मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प केला आहे. त्यासाठी औद्योगिक क्षेत्रात विशेष आर्थिक तरतूद केली आहे, अशी माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी येथे दिली.
भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवडच्या वतीने रविवारी येथे मराठवाडा स्नेह ोळाव्यात मार्गदर्शन करताना ठाकूर बोलत होते. आमदार व भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप मेळाव्याचे अध्यक्ष होते. या वेळी समाज कल्याणमंत्री दिलीप कांबळे, संघटन मंत्री रवी अनासपुरे, भाजपा प्रदेश सचिव उमा खापरे, भाजपा प्रदेश सदस्य एकनाथ पवार, सदाशिव खाडे, अनुसूचित मोर्चा शहराध्यक्ष मनोज तोरडमल, पांडुरंग धोमडे, शशिकांत दुधारे, भागवत शिंदे, संजय सूर्यवंशी, गोपाळ माळेकर, अरुण पवार आदी उपस्थित होते.
ठाकूर म्हणाले, मराठवाड्यातील नागरिक मेहनती आणि कष्टाळू आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या कार्यकाळात सर्वांत जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. (वार्ताहर)