विकासाभिमुख नेतृत्व नव्या पिढीसाठी प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:14 AM2021-08-24T04:14:43+5:302021-08-24T04:14:43+5:30

नीरा-भीमा कारखान्यावरती कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित वृक्षारोपण, आरटीपीसीआर तपासणी, केक कापणे, विद्यार्थ्यांना वह्यावाटप आदी कार्यक्रमप्रसंगी ...

Development-oriented leadership inspires a new generation | विकासाभिमुख नेतृत्व नव्या पिढीसाठी प्रेरणादायी

विकासाभिमुख नेतृत्व नव्या पिढीसाठी प्रेरणादायी

Next

नीरा-भीमा कारखान्यावरती कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित वृक्षारोपण, आरटीपीसीआर तपासणी, केक कापणे, विद्यार्थ्यांना वह्यावाटप आदी कार्यक्रमप्रसंगी अध्यक्षस्थानावरून लालासाहेब पवार बोलत होते. या वेळी उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, उदयसिंह पाटील, विलासराव वाघमोडे, ॲड. कृष्णाजी यादव, कार्यकारी संचालक डी. एन. मरकड यांची हर्षवर्धन पाटील यांना शुभेच्छा देणारी भाषणे झाली. या वेळी कारखान्याचे संचालक दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, दादासो घोगरे, हरिदास घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, भागवत गोरे, कमाल जमादार, माणिकराव खाडे, महादेव शेंडगे, के. एस. खाडे, डॉ. विनोद पवार, डॉ. संतोष खाडे, अधिकारी-कर्मचारी, उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक सुभाष घोगरे यांनी केले.

राज्यात २० वर्षे विविध खात्यांचे मंत्री म्हणून काम करीत असताना पाटील यांनी आपले प्रभावशाली नेतृत्व सिद्ध केले आहे. त्यांचे व्यक्तिमत्व दूरदृष्टीचे असून राज्यातील सहकार क्षेत्रातील ते ज्येष्ठ व अभ्यासू नेते आहेत. इंदापूर तालुक्यात त्यांनी तालुका पातळीवरील विविध संस्था उभारून हजारो कुटुंबांना उभे केले आहे. येणारा काळ हा त्यांच्या राजकीय भरभराटीचा व अतिशय प्रगतीचा असणार आहे असे लालासाहेब पवार यांनी भाषणात नमूद केले.

नीरा-भीमा कारखान्या स्थळावरील कार्यक्रमात बोलताना लालासाहेब पवार.

२३०८२०२१-बारामती-०५

Web Title: Development-oriented leadership inspires a new generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.