नीरा नृसिंहपूर येथील विकासकामे संथगतीने सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:08 AM2021-06-27T04:08:30+5:302021-06-27T04:08:30+5:30
लक्ष्मी नृसिंह मंदिराच्या पाठीमागे दोन नद्यांच्या संगमावर मारुती मंदिराकडे जाण्यासाठी रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून अनेक दिवस उलटून गेले, तरी ...
लक्ष्मी नृसिंह मंदिराच्या पाठीमागे दोन नद्यांच्या संगमावर मारुती मंदिराकडे जाण्यासाठी रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून अनेक दिवस उलटून गेले, तरी ते काम व पिंपरी बुद्रुक ते नीरा नृसिंहपूर रस्त्याचे काम देखील धीरे धीरे चालू आहे. मंदिराच्या पाठीमागे सुळ खांबाकडे जाताना वाळूचे व खडीचे ढीग, सडलेले पत्रे दगड यापासून भाविकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते कुलदैवत असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी २६० कोटी रुपये निधी मंजूर करून कामे चालू केली असून उर्वरित राहिलेली कामे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या प्रयत्नाने चालू आहेत, राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी देऊन सुद्धा ठेकेदारांचा मनमानी कारभार चाललेला आहे.
राज्यातील व राज्याबाहेरील भाविक भक्त हजारोंच्या संख्येने परंपरेपासून दर्शन घेण्यासाठी येत असतात लक्ष्मी नृसिंह देवस्थानचे दर्शन चालू होण्याअगोदर मंदिराच्या पाठीमागे दोन नद्यांच्या संगमाकडे जाणारा रस्ता लवकरच काम पूर्ण करून घ्यावे अशी भाविक भक्तांची मागणी आहे.
मंदिराच्या पाठीमागे सुळखंबाकडे जाणारा रस्ता.
२६०६२०२१-बारामती-११