राजस्थान आणि कर्नाटकात विकासकामे ठप्प, घोषणाही अपूर्ण; PM नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 02:44 PM2023-08-01T14:44:05+5:302023-08-01T14:57:16+5:30
कर्नाटकात चुकीच्या घोषणा देऊन सरकार स्थापन तर राजस्थानात कर्जाचा डोंगर
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारल्यानंतर मेट्रो च्या फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय आणि गरवारे स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या दोन मार्गिकांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बटन दाबून केले. तसेच पंतप्रधान आवास योजनेतील घरांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटक आणि राजस्थान सरकारवर टीका केली आहे.
आज भारत सर्वात गतीने 5 जी सर्व्हिस देणारा देश होत आहे. या देशातील तरुण सर्वच क्षेत्रात कमाल करत आहेत. महाराष्ट्र एकीकडे विकास करत असताना दुसरीकडे कर्नाटकात काय होत आहे ते आपण पाहतो. ज्याप्रमाणे विकास होणे अपेक्षित होते तसा कर्नाटक राज्याचा विकास होताना दिसत नाही. ज्या घोषणा दिल्या त्या पूर्ण होत नाहीत. ही परिस्थिती देशासाठी खुप चिंताजनक आहे. हीच परिस्थिती राजस्थानमध्ये आहे. त्याठिकाणी विकासाची कामे ठप्प झाली असल्याचे मोदी यावेळी म्हणाले आहेत.
मेट्रो नेटवर्क आधुनिक भारत ची नवी लाईफलाईन
मला पुण्यात येण्याचं सौभाग्य मिळालं. देशभर स्वप्नांना पूर्ण करणारा पुणे हे जिवंत शहर आहे. आता १५ हजार करोड रुपये प्रकल्पांचं उदघाटन झालं आहे. हजारो लोकांना घरे मिळाली आहेत. आमचे सरकार मध्यमवर्गीय लोकांच्या हिताचं सरकार आहे. पुणे मेट्रोच्या अजून एक स्टेशनच लोकार्पण झालं आहे. या पाच वर्षात मेट्रो नेटवर्क सुरु झालाय. आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्ट ला आधुनिक बनवावा लागेल. यासाठी मेट्रोचा विस्तार होतोय. देशातील मेट्रो नेटवर्क ८०० किलोमीटर पेक्षा जास्त. २०१४ मध्ये ५ शहरात मेट्रो नेटवर्क होता. आज देशातील २० शहारत मेट्रो आहे. मेट्रो नेटवर्क आधुनिक भारताची नवी लाईफलाईन आहे.
सर्वांची स्वप्न पूर्ण करण्याची मोदींची गॅरंटी
2014 मध्ये तुम्ही आम्हाला सेवा करण्याची संधी दिली. मागील 9 वर्षात आमच्या सरकारने गाव आणि शहरात 4 करोड घरे तयार केलीत. शहरी गरिबांसाठी 75 लाख घरे आम्ही तयार केली. जी घरे आम्ही तयार करतो त्यातील सर्वाधिक घरे महिलांच्या नावावर केली जातात.. या घरांची किंमत काही लाखात आहे. या माध्यमातून मागील काही वर्षात अनेक बहिणी लखपती झाल्यात. गरीब असो की मध्यमवर्गीय या सर्वांची स्वप्न पूर्ण करण्याची मोदींची गॅरंटी आहे.