विकासकामे थांबणार नाहीत : दत्तात्रय भरणे
By admin | Published: January 11, 2017 02:17 AM2017-01-11T02:17:44+5:302017-01-11T02:17:44+5:30
आपण जनतेने निवडून दिलेला आमदार आहोत. जनतेची कामे करताना कितीही अडचणी आल्या तरी विकासकामे थांबणार नाहीत, असे मत आमदार दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.
भिगवण : आपण जनतेने निवडून दिलेला आमदार आहोत. जनतेची कामे करताना कितीही अडचणी आल्या तरी विकासकामे थांबणार नाहीत, असे मत आमदार दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.
भिगवणमधील १० कोटी १७ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ पार पडला. या वेळी आमदार दत्तात्रय भरणे बोलत होते. पुढे बोलताना भरणे म्हणाले, ‘रेल्वे उड्डाणपुलाला तालुक्याचा आमदार म्हणून विरोध आहे. जोपर्यंत भिगवण स्टेशन येथील नागरिकांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत पुलाचे काम सुरू करू देणार नाही, असे सांगितले.
या वेळी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, सचिन सपकळ, पंचायत समिती सदस्या मेघना बंडगर, आबासाहेब देवकाते, सरपंच हेमा माडगे, प्रदीप वाकसे, प्रशांत शेलार, तुकाराम बंडगर, बापूराव थोरात, महेश शेंडगे, जयदीप जाधव, शंकरराव गायकवाड, रामहरी चोपडे, प्रभाकर जाडकर, गणेश राक्षे, विक्रम शेलार, विठ्ठल म्हस्के, सचिन बोगावत, महेश देवकाते उपस्थित होते.(वा. प्र.)
उड्डाणपुलाला विरोध
भिगवण स्टेशन येथील ग्रामस्थांनी उड्डाणपुलाला विरोध करत आधी पुनर्वसन करा मगच कामाला सुरुवात करा. ५० ते ६० घरे उद्ध्वस्त होणार असल्याची माहिती विठ्ठल म्हस्के, लाला धवडे, संघटनेचे अध्यक्ष रामहरी चोपडे यांनी केली.