पुणेकर, तुम्ही खूप पाणी वापरता! देवेंद्र फडणवीसांची विविध प्रश्नांवर उत्तरे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 10:05 AM2022-09-26T10:05:46+5:302022-09-26T10:07:05+5:30

पुणेकराने पाण्याविषयी प्रश्न विचारला असता....

Devendra Fadnavis Answers to Various Questions in pune water shortage in pune city | पुणेकर, तुम्ही खूप पाणी वापरता! देवेंद्र फडणवीसांची विविध प्रश्नांवर उत्तरे

पुणेकर, तुम्ही खूप पाणी वापरता! देवेंद्र फडणवीसांची विविध प्रश्नांवर उत्तरे

Next

पुणे :पुणेकर सर्वांत जास्त पाणी वापरतात, अशी तक्रार महाराष्ट्राची आणि पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे. तरीदेखील पुणेकरांना पाण्याची टंचाई जाणवते. लवकरच २४ तास पाण्याची योजना सुरू होईल. तिचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय कमी होईल. धरणातील पाणी वाचेल, असे उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यांना एका पुणेकराने पाण्याविषयी प्रश्न विचारला असता ‘तुम्ही खूप पाणी वापरता’ असे बोलून पुणेकरांवर निशाणा साधला, तसेच विविध प्रश्नांवर उत्तरे दिली.

प्रश्न : पुण्यात पाण्याची टंचाई?

- पुणेकरांसाठी २४ तास पाणी योजना लवकरच सुरू होईल. त्यामुळे कुठे टंचाई जाणवणार नाही, तसेच एमआयडीसीचे प्रदूषित पाणी नदीत जाते. त्यावर प्रक्रिया करून तेच वापरण्यासाठी सांगणार आहोत. त्यातून नदी प्रदूषित होणार नाही आणि पाण्याचा पुनर्वापरही होईल.

वाहतूक कोंडी प्रचंड, रस्ते मोठे करा?

- नगर रस्ता, नाशिककडे जाणारा रस्ता येथे वाहतूक कोंडी होते. काही ठिकाणी आम्ही इलिव्हेटेड रस्ते करत आहोत. त्याने कोंडी फुटेल. दीड- दोन वर्षांनंतर हा त्रास होणार नाही. पुणे- नाशिक हायस्पीड रेल्वेचे कामही सुरू होईल.

पुण्यात आयआयटी किंवा आयआयएम का नाही?

- पुण्यातील शैक्षणिक संस्था आयआयटी, आयआयएमपेक्षाही उत्कृष्ट काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयआयटीची संख्या वाढवली आहे; पण सर्वत्र त्या करता येत नाहीत. पुण्यात खूप शैक्षणिक संस्था असून, त्यांच्यात जागतिक स्तरावरील शिक्षणातील एक्सलन्स आहे. म्हणून इथे आयआयटी, आयआयएमची गरजच नाही.

महिला उद्योजकांसाठी रोजगार योजना काय?

- देशातील अनेक मोठ्या महिला उद्योजिका या पुण्यातून वर आलेल्या आहेत. पुण्याचे हे मोठे योगदान आहे. त्यामुळे अजून महिला उद्योजकांसाठी पोषक वातावरण किंवा योजना करायची असेल, तर नक्कीच करू.

पुण्यात विजेचा तुटवडा?

- शेतीची वीज सौरऊर्जेवर नेण्यासाठी प्रयत्न करतोय. कृषीचे ४ हजार मेगावॅट फिडर यावर आणणार आहोत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वीज उपलब्ध होईल, ती उद्योगाला देऊ.

Web Title: Devendra Fadnavis Answers to Various Questions in pune water shortage in pune city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.