"देवेंद्र फडणवीस दबंग नेते, शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात", चंद्रकांत पाटलांचं खळबळजनक विधानं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 03:16 PM2021-09-20T15:16:36+5:302021-09-20T15:21:17+5:30

अजित पवारांसोबत शपथ घेणं ही कॅल्क्युलेटेड रिस्क असं ते म्हणाले आहेत.

"Devendra Fadnavis Daband leader, Ajit Pawar in his pocket", Chandrakant Patil's sensational statement | "देवेंद्र फडणवीस दबंग नेते, शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात", चंद्रकांत पाटलांचं खळबळजनक विधानं

"देवेंद्र फडणवीस दबंग नेते, शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात", चंद्रकांत पाटलांचं खळबळजनक विधानं

Next
ठळक मुद्देकाँग्रेस नेत्यांचे घोटाळेही भाजप काढणार असल्याचा पाटलांचा इशारा

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीबरोबरच हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावरून परिषदेत खबळजनक विधान केलं आहे. 

‘देवेंद्र फडणवीस दबंद नेते आहेत, ते शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात, फडणवीसांच्या वयावर तुम्ही जाऊ नका’,  अजित पवारांसोबत शपथ घेणं ही कॅल्क्युलेटेड रिस्क असं ते म्हणाले आहेत. 

''येत्या दोन दिवसात काँग्रेसच्या दोन नेत्यांचे विषय समोर येतील, असं मोठं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्याच नव्हे तर आता काँग्रेस नेत्यांचे घोटाळेही भाजप काढणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.'' 

''अनिल देशमुख यांच्यावर ईडीची कारवाई झाली. त्यातून वेगवेगळी माहिती देत ते मार्ग बदलू लागले आहेत. त्यावर बोलताना पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना मी उद्धव ठाकरेंना सल्ला दिला होता की, राष्ट्रवादीकडे गृह खातं देऊ नका.'' 

राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदारांबरोबरच काँग्रेसच्याही नेत्यांची नावे बाहेर 

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपल्यावर केलेल्या आरोपमागे चंद्रकांत पाटील यांचा हात असल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला होता. त्यानंतर लगेचच चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मुश्रीफ यांच्या आरोपांची हवा काढून घेत त्यांनी मुद्द्यावर बोलण्याचं आवाहन केलं. तसेच अनेकांना असं वाटतं की, घोटाळ्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार सापडत आहेत. दोन काँग्रेसच्याही नेत्यांची नावे आली आहेत. दोन दिवसात त्यांचेही विषय समोर येतील, असं विधान करून पाटील यांनी खळबळ उडवून दिली आहे.

माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही - पाटलाचं टोला 
 
माझं आंबाबाई ला साखळं आहे की मुश्रीफ बरे झाले पाहिजे, त्यांनी पॅनिक नको व्हायला हसन मुश्रीफ यांना माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. माझ्या विरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा करू शकतात. अनिल देशमुख यांच्यावर ईडीची कारवाई झाली पण ते माहिती देत देत सहकुटुंब गायब झाले. तसाच मार्ग मुश्रीफ यांच्याकडे असल्याचं ते म्हणाले आहेत.

चंद्रकांत पाटलांकडून मला भाजपमध्ये येण्याची ऑफर – हसन मुश्रीफ

चंद्रकांत पाटील हे भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या जिल्ह्यात भाजप भुईसपाट झाला, हे भुईसपाट कुणामुळे झालं, तर मुश्रीफांमुळे, त्यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली. मी त्यांना ठणकावून सांगितलं, पवार एके पवार. त्यांनी माझ्यावर इन्कम टॅक्सची धाड टाकली, आता महाविकास आघाडी प्रबळ झाली आहे. त्यांच्यासमोर भाजपला यश मिळत नाही, त्यामुळे हे सुरु आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

Web Title: "Devendra Fadnavis Daband leader, Ajit Pawar in his pocket", Chandrakant Patil's sensational statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.