देवेंद्र फडणवीस खोटं बोलून राजकारण करत नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 07:02 PM2023-02-15T19:02:02+5:302023-02-15T19:02:15+5:30

देवेंद्र फडणवीस कधीच असत्याचा आधार घेत नाहीत

Devendra Fadnavis does not do politics by lying Explanation by Chandrasekhar Bawankule | देवेंद्र फडणवीस खोटं बोलून राजकारण करत नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण

देवेंद्र फडणवीस खोटं बोलून राजकारण करत नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण

Next

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा गौप्यस्फोट केल्यानंतर यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. पहाटेच्या शपथविधीबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा झाली होती, असा मोठा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. यानंतर महाविकास आघाडीचे नेत्यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

बावनकुळे म्हणाले, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटं बोलून राजकारण करत नाही. फडणवीस कधीच असत्याचा आधार घेत नाहीत. ते कधीच असत्य विधान करत नाहीत. ते त्यांच्या रक्तात नाही. जे घडलं आहे तेच फडणवीस बोलत असतात. पोटनिवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले, कसबा आणि चिंचवडची निवडणूक बिनविरोध करावी म्हणून आम्ही महाविकास आघाडीला विनंती केली होती. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही विनंती केली होती. महाविकास आघाडीने आमची विनंती मान्य केली नाही. पण राज ठाकरे यांनी आमची विनंती मान्य केली. राज ठाकरे यांनी प्रचारात सहभागी व्हावे म्हणून आम्ही त्यांना विनंती करणार आहोत. ते येत नसतील तर त्यांचा प्रतिनिधी तरी प्रचारासाठी देण्यात यावा अशी विनंती आम्ही त्यांना करणार आहे. 

शहा यांचा दौरा नियोजित

कसब्याचं आम्हाला आव्हान नसून आम्ही प्रत्येक निवडणूक गांभीर्याने घेत असतो. कसब्यात केंद्रीय पातळीवरून कुणीही प्रचारासाठी येणार नाही. राज्य पातळीवरचे नेते प्रचारासाठी येतील. अमित शहा यांचा दौरा आणि निवडणुकीचा काहीच संबंध नाही. शाह यांचा दौरा नियोजित होता, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

फडणवीस यांना अभिमन्यू करण्यात आलं

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरें यांच्या सभांचे रेकॉर्ड माझ्याकडे आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवणार असच म्हटलं गेलं. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांना अभिमन्यू करण्यात आलं आहे. सूड भावनेने कधी काम केलं नाही पण फडणवीस यांचा विश्वासघात केला जातोय, असंही त्यांनी सांगितलं.

भीमाशंकर बाबत काय दावा करायचा तो करू द्या, आपली श्रद्धास्थान कायम

आसाम सरकारने महाराष्ट्रातील भीमाशंकर या देवस्थानावर दावा केला आहे. त्याबाबत विचारले असता चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आसाम सरकारला काय दावा करायचा तो करूद्या. मात्र आपली श्रद्धास्थान कायम राहणार आहेत, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.ज्या विरोधकांनी उद्योगांसाठी एकही बैठक घेतली नाही. ते आता उद्योग गेला म्हणत आहेत. फक्त बातम्या पेरण्याचे काम करत आहेत. पण एकही पेपर दाखवू शकले नाहीत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Web Title: Devendra Fadnavis does not do politics by lying Explanation by Chandrasekhar Bawankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.