भाजपात देवेंद्र फडणवीसांचं महत्त्व कमी झालंय, ज्यांना तिकीट नाकारलं ते सरचिटणीस झाले- नवाब मलिक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 03:04 PM2021-11-30T15:04:53+5:302021-11-30T15:07:22+5:30

नवाब मलिक म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. ते सत्तेवर येण्यासाठी काहीही करू शकतात...!

devendra fadnavis importance bjp has diminished vinod tawade nawab malik | भाजपात देवेंद्र फडणवीसांचं महत्त्व कमी झालंय, ज्यांना तिकीट नाकारलं ते सरचिटणीस झाले- नवाब मलिक

भाजपात देवेंद्र फडणवीसांचं महत्त्व कमी झालंय, ज्यांना तिकीट नाकारलं ते सरचिटणीस झाले- नवाब मलिक

Next

पुणेे: राज्य सरकारला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. या काळात कोरोना असतानाही सरकारने कुठलाही प्रकल्प रद्द केला नाही. अनेक योजना अंमलात आणल्या. महागाई, बेरोजगारी मोठा प्रश्न असताना ऑनलाइन नोकरी देण्याच काम आम्ही केलं आहे, असं मंत्री नवाब मलिकांनी सांगितले. पुढे बोलताना मलिक म्हणाले, जेव्हापासून महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं तेव्हापासून देवेंद्र फडणवीस आमच्या सरकारला डेडलाईन देत होते. त्यात कधी चंद्रकांतदादा म्हणत होते सरकार पडेल, यांनी साम दाम दंड भेद याचा वापर केला. परत आता सरकार पाडण्यासाठी नारायण राणेंनी मार्चची डेडलाईन दिली. त्यांना माहिती आहे आता सरकार पडत नाही.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. ते सत्तेवर येण्यासाठी काहीही करू शकतात. सध्या फडणवीस त्यांच्या पक्षात छोटे होऊ लागले आहेत. भाजपमध्ये अंतर्गत वाद आहे, असं नवाब मलिक म्हणाले. विनोद तावडे यांची भाजपच्या सरचिटणीसपदी निवड झाली आहे. यावर बोलताना मलिक म्हणाले, ज्यांना भाजपमध्ये तिकीट नाकारले ते आता भाजप पक्षाचे सरचिटणीस झाले याचा अर्थ काय?

Web Title: devendra fadnavis importance bjp has diminished vinod tawade nawab malik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.