पंढरपुरात उभारले भक्तनिवास

By admin | Published: April 24, 2017 04:26 AM2017-04-24T04:26:18+5:302017-04-24T04:26:18+5:30

येथील श्री क्षेत्र रामदरा शिवालय यांच्या वतीने तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे धर्मशाळा उभारण्यात आल्याने लोणी काळभोर येथील भाविक

Devotees built at Pandharpur | पंढरपुरात उभारले भक्तनिवास

पंढरपुरात उभारले भक्तनिवास

Next

लोणी काळभोर : येथील श्री क्षेत्र रामदरा शिवालय यांच्या वतीने तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे धर्मशाळा उभारण्यात आल्याने लोणी काळभोर येथील भाविक व वारी करणाऱ्या विठ्ठलभक्तांना हक्काच्या निवाऱ्याची सोय झाली आहे.
लोणी काळभोर येथील अंबरनाथ रामदरा शिवालय प्रासादिक दिंडीतील सुमारे ८00 वारकरी प्रत्येक आषाढ, कार्तिकी व माही वारीसाठी पंढरपूर येथे गेल्या अनेक वर्षांपासून जातात. परंतु तेथे मुक्काम करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. ही अडचण लक्षात आल्यानंतर श्री क्षेत्र रामदरा शिवालयाचे महंत हेमंतपुरी महाराज यानी पंढरपूर येथील जुना अकलूज रोडनजीकच्या बैलबाजाराशेजारी ११ गुंठे जागा घेतली. त्यामध्ये ४५०० स्क्वेअर फुटाचा हॉल बांधला आहे.
मंदिरात शुक्रवारी (दि. २१) विठ्ठल-रुक्मिणी, श्रीराम, श्रीमंत अंबरनाथ, मारुती, गरूड यांचेसमवेत श्रीमहंत १००८ देवीपुरी महाराज ऊर्फ धुंदीबाबा, मंगलपुरी महाराज व मंगलपुरी महाराज यांच्या मूर्तींची श्री क्षेत्र रामदरा शिवालयाचे महंत हेमंतपुरीमहाराज यांचे हस्ते तसेच विधिवत प्रतिष्ठापना केली. ५० साधूंसमवेत अंबरनाथ रामदरा शिवालय प्रासादिक दिंडीचे अध्यक्ष विनोदमहाराज, दिंडीतील सर्व सदस्य तसेच लोणी काळभोरसह पुणे, पिंपरी-चिंचवड, बेलावडे (सातारा) येथील सुमारे भाविक उपस्थित होते. तत्पूर्वी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर प्रदक्षिणा मार्ग ते धर्मशाळा या दोन किमी अंतरावर मूर्तींची ढोलताशांच्या निनादात मिरवणूक काढली होती. धर्मशाळा उभारणी ते मूर्तींची प्रतिष्ठापना यासाठी सुभाष कुदळे, शिवाजी काळभोर, संतोष जगताप (आळंदी देवाची), रामभाऊ बनकर, गोविंद काळभोर, बापू देवडे, धोंडिबा काळभोर यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. (वार्ताहर)

Web Title: Devotees built at Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.