Ashadhi wari 2022 | पंढरपूरहून येणाऱ्या भाविकांचा ४० किमीचा वळसा वाचला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 01:43 PM2022-07-11T13:43:19+5:302022-07-11T13:45:01+5:30

पिसुर्टी येथील रेल्वे गेटचे गेली दोन दिवस चाललेले काम शनिवारी संध्याकाळी पूर्ण...

Devotees coming from Pandharpur survived a 40 km detour ralway gate work completed | Ashadhi wari 2022 | पंढरपूरहून येणाऱ्या भाविकांचा ४० किमीचा वळसा वाचला

Ashadhi wari 2022 | पंढरपूरहून येणाऱ्या भाविकांचा ४० किमीचा वळसा वाचला

Next

नीरा :पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील वाल्हे-नीरादरम्यानचे पिसुर्टी येथील रेल्वे गेटचे गेली दोन दिवस चाललेले काम शनिवारी संध्याकाळी पूर्ण झाल्यानंतर आता हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. गेले दोन दिवस पंढरपूरच्या यात्रेला जाणाऱ्या भाविकांना तब्बल ४० किलोमीटरचा वळसा बसत होता, तो आता परतीच्या वेळी बसणार नाही.

पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-मिरज लोहमार्गावरील वाल्हे नीरादरम्यान पिसुर्टी येथे असलेल्या रेल्वे फाटकामधील लोहमार्गाच्या दुरुस्तीचे व दुपदरीकरणाचे काम रेल्वे विभागाकडून करण्यात येत होते, त्यामुळे पुणे-पंढरपूर ही वाहतूक जेजुरी-मोरगाव-नीरा अशी वळविण्यात आली होती. दोन दिवस हे काम सुरू असल्याने पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना चाळीस किलोमीटरचा वळसा मारावा लागत होता. महाराष्ट्रातील सर्वांत प्रसिद्ध, तसेच सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाची यात्रा रविवारी होती. याच काळात रेल्वे गेटमध्ये हे काम सुरू झाल्याने लोकांचे हाल झाले. त्याचा ताण रेल्वे विभागावरही आला.

रेल्वे विभागाकडून शनिवारी (दि.९) संध्याकाळी युद्धपातळीवर संपूर्ण काम करण्यात आले असून, हे फाटक आता पुन्हा वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे पंढरपूरहून येणाऱ्या भाविकांना दिलासा मिळाला आहे. या मार्गावरून पंढरपूरला जाताना भाविकांना तबब्ल ४० किमीचा वळसा पडला होता. एकादशीनंतर आता अनेक वाहने पुण्याकडे जाणार आहेत. त्यामुळे स्थानिक लोकांनी व वारकऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले. मात्र, या कालावधीमध्ये प्रशासनाने योग्य ती खबर न घेतल्याने पंढरपूरला जाणाऱ्या लोकांनी नाराजी व्यक्त केली. दोन दिवस लोकांना प्रचंड अडचणीला सामोरे जावे लागले.

शनिवारी रात्री राज्याचे मुख्यमंत्री पुण्यातून याच मार्गाने पंढरपूरकडे जाणार होते. मात्र, हडपसर येथे आल्यावर पोलिसांनी सतर्कता बाळगत मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा थेट सोलापूर रोडने पुढे मार्गस्थ केला. एरवी दरवर्षी मुख्यमंत्र्यांचा पंढरपूर दौरा हा हडपसर, दिवेघाट, सासवड, जेजुरी, नीरा या मार्गेच जात असतो. मात्र, काल सायंकाळी काम झाले असतानाही रात्री उशिरा जाणारा मुख्यमंत्र्यांचा ताफा सोलापूरमार्गे गेला.

Web Title: Devotees coming from Pandharpur survived a 40 km detour ralway gate work completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.