सासवडच्या विसावा मंदिरात भाविकांनी घेतले मंदिरात मुखदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:10 AM2021-07-21T04:10:01+5:302021-07-21T04:10:01+5:30

सासवडला श्री संत सोपानदेव महाराज संजीवन समाधी घेतेवेळी प्रत्यक्ष श्री पांडुरंग तेथे आले होते, त्या वेळी पांडुरंग कऱ्हाकाठी विश्रांतीसाठी ...

Devotees pay homage at the Visava temple in Saswad | सासवडच्या विसावा मंदिरात भाविकांनी घेतले मंदिरात मुखदर्शन

सासवडच्या विसावा मंदिरात भाविकांनी घेतले मंदिरात मुखदर्शन

googlenewsNext

सासवडला श्री संत सोपानदेव महाराज संजीवन समाधी घेतेवेळी प्रत्यक्ष श्री पांडुरंग तेथे आले होते, त्या वेळी पांडुरंग कऱ्हाकाठी विश्रांतीसाठी थांबले होते तेथेच मंदिर बांधण्यात आले व विठ्ठलाच्या विश्रांतीमुळे ते विसावा विठ्ठल मंदिर म्हणून गणले गेले, अशी आख्यायिका सांगितली जाते. सध्या किरण व तुळशीदास पुरंदरे यांच्याकडे या मंदिराची मालकी असून श्री विठ्ठल रुक्मिणी पुरंदरे ट्रस्ट नावाने ते ओळखले जाते.

दरम्यान आज भल्या सकाळी मंदीरात यतीन पुरंदरे वअर्चना पुरंदरे यांनी अभिषेक, महापूजा व तत्सम धार्मिक विधी पार पाडले. उत्तम एक्के आणि कुमार मेरुकर यांनीही अभिषेक पूजा विधी केले. महाआरती होऊन मंदिर बंद करण्यात आले. दिवसभर भाविकांनी मंदिराबाहेरून मुख दर्शन व कळस दर्शन घेतले. सायंकाळी मोजक्या मंडळींसह हनुमान प्रासादिक भजन मंडळाची भजन सेवा झाली. मंदिराचे मालक तुलसीदास व किरण पुरंदरे यांच्यासह सुहास शिवले, सौरभ जगताप, आरती पुरंदरे, बोरकर कुटुंबीय यांनी सर्व धार्मिक विधींचे आयोजन केले होते. सलग दुसऱ्या वर्षीही करोनामुळे विठ्ठल दर्शन न झाल्याने अनेक भाविकांनी खंत व्यक्त केली.

--

फोटो क्रमांक : २० सासवड आषाढी विठ्ठल मंदिर

फोटो.. सासावड येथील विसावा विठ्ठल मंदिरातील श्री विठ्ठल मूर्ती

200721\20pun_1_20072021_6.jpg

फोटो क्रमांक : २० सासवड आषाढी विठ्ठल मंदिरफोटो.. सासावड येथील विसावा विठ्ठल मंदिरातील श्री विठ्ठल मूर्ती

Web Title: Devotees pay homage at the Visava temple in Saswad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.