शेवटच्या श्रावण सोमवारनिमित्त चतुर्मुख महादेवाचे भाविक-भक्तांनी घेतले दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:13 AM2021-09-07T04:13:45+5:302021-09-07T04:13:45+5:30
पुरंदर, भोर, हवेली या तीन तालुक्यांच्या सीमेनजीक असलेले चतुर्मुख शंभू महादेवाचे पुरातन मंदिर आहे. त्यामुळे या प्राचीन धार्मिक स्थळाला ...
पुरंदर, भोर, हवेली या तीन तालुक्यांच्या सीमेनजीक असलेले चतुर्मुख शंभू महादेवाचे पुरातन मंदिर आहे. त्यामुळे या प्राचीन धार्मिक स्थळाला दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते. ऐतिहासिक कऱ्हा नदी व कऱ्हेची उपनदी चरणावतीचा उगम येथूनच होतो. त्यामुळे येथील महादेवाच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून अनेक भाविक येथे दर वर्षी येतात. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी अत्यंत कमी होते.
श्रावणी सोमवारनिमित्त पहाटे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत शंभू महादेवाचे धार्मिक विधी झाले. या वेळी भिवरी ,गराडे , बोपगाव ,चांबळी , दरेवाडी, वारवडी, थापेवाडी, मठवाडी, रावडेवाडी, गोगलवाडी, पठारवाडी, वेळू, शिवापूर, आस्करवाडी येथील भाविक भक्तांनी शंभू महादेवाच्या मंदिराच्या कळस दर्शनाचा लाभ घेतला.
--
फोटो क्रमांक: ०६ गराडे भैरवनाथ मंदिर
फोटोओळी - भिवरी (ता.पुरंदर ) येथील भैरवनाथ सेवा मंडळाची मानाची पालखी श्रावण अमावास्येनिमित्त चतुर्मुख शंभू महादेवाच्या दर्शनासाठी जात असतानाचे दृष्य.