तळीराम’च्या भूमिकेवर भक्ती आणि श्रद्धा : जयंत सावरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:28 AM2020-12-16T04:28:40+5:302020-12-16T04:28:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ’तळीरामा’च्या भूमिकेचे तीन चर्तुंथांश यश हे लेखकाच्या वाक्यांमध्येच आहे. ही वाक्ये पद्धतशीरपणे, व्यवस्थितरित्या, अर्थ ...

Devotion and faith in the role of Taliram: Jayant Savarkar | तळीराम’च्या भूमिकेवर भक्ती आणि श्रद्धा : जयंत सावरकर

तळीराम’च्या भूमिकेवर भक्ती आणि श्रद्धा : जयंत सावरकर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ’तळीरामा’च्या भूमिकेचे तीन चर्तुंथांश यश हे लेखकाच्या

वाक्यांमध्येच आहे. ही वाक्ये पद्धतशीरपणे, व्यवस्थितरित्या, अर्थ बाहेर काढून प्रेक्षकांपर्यंत पोचली तर ‘तळीरामा’चे काम करणारा कलावंत हा मोठा नट ठरतो. माझी या पात्रावर भक्ती आहे, श्रद्धा आहे, अशी भावना तब्बल 40 वर्षांपासून ‘संगीत एकच प्याला’ या नाटकाशी नाळ जोडले गेलेल्या ज्येष्ठ कलावंत जयंत सावरकर यांनी व्यक्त केली.

सहा वर्षांच्या खंडानंतर 85 वर्षांचे जयंत सावरकर पुन्हा एकदा साकारत आहेत ‘तळीराम’! पुण्यात या संगीत नाटकाचा हा पहिलाच प्रयोग होत आहे. या प्रयोगाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या नाटकातील कलावंत कुठलेही मानधन न घेता प्रयोग करणार आहेत.

वरद रंगभूमी, मुंबई या संस्थेतर्फे राम गणेश गडकरी लिखित आणि चित्तरंजन कोल्हटकर दिग्दर्शित ''''''''संगीत एकच प्याला'''''''' या नाटकाचे महाराष्ट्राच्या कानाकोप-यात अनेक प्रयोग झाले आहेत. प्रयोगांची मालिका २०१४ पर्यंत अव्याहतपणे सुरू होती. सहा वर्षांनंतर अशोक अवचट आणि सुचेता अवचट दाम्पत्याने या प्रयोगासाठी पुढाकार घेतला आहे. या नाटकाचा प्रयोग शनिवारी ( 19 डिसेंबर) दुपारी 12:30 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात होत आहे.

सावरकर म्हणाले, जवळ-जवळ 40 वर्षे मी या नाटकात काम करतो आहे. या नाटकात वेगवेगळ्या भूमिका करताना एकदा भगीरथाचे काम मिळाले. भगीरथाची भूमिका करताना माझ्यासमोर ‘तळीरामा’च्या भूमिकेत शरद तळवलकर, राजा गोसावी, चित्तरंजन कोल्हटकर, गणेश सोळंकी, सुहास भालेकर, दामूअण्णा मालवणकर, वसंत शिंदे अशी सगळी दिग्गज मंडळी होती. त्यांच्याबरोबर काम करता करता त्या प्रत्येकाचा तळीरामाच्या भूमिकेचा जो अंश मिळाला तो मी आत्मसात केला. बाळ कोल्हटकर यांच्याबरोबर काम करणारे जोगळेकर नावाचे एक ज्येष्ठ नट होते त्यांच्याकडून मी ब-याच गोष्टी शिकून घेतल्या. गेल्या सहा वर्षांत या नाटकाचे प्रयोग झाले नसल्याने तालीम आवश्यक आहे.

------

Web Title: Devotion and faith in the role of Taliram: Jayant Savarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.