‘देवपाल’मुळे पाणीप्रश्न सुटेल

By admin | Published: October 11, 2014 06:56 AM2014-10-11T06:56:32+5:302014-10-11T06:56:32+5:30

राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या देवपाल (ता. वेल्हे) येथील सुमारे ५ कोटी रुपये किमतीच्या देवपाल लघुपाटबंधारे तलावाची मंजुरी अंतिम टप्प्यात आहे

'Devpal' will leave a water question because of it | ‘देवपाल’मुळे पाणीप्रश्न सुटेल

‘देवपाल’मुळे पाणीप्रश्न सुटेल

Next

भोर : राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या देवपाल (ता. वेल्हे) येथील सुमारे ५ कोटी रुपये किमतीच्या देवपाल लघुपाटबंधारे तलावाची मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. हे काम पूर्ण झाल्यावर ७ गावांतील सुमारे ४५० ते ५०० एकर शेतीचे क्षेत्र ओलिताखाली येऊन गावातील पाणीटंचाई दूर होणार आहे. या लघुपाटबंधारे तलावामुळे बाधित होणाऱ्या जमिनींचा मोबदला व शेतकऱ्यांचे पुनर्वसन करून, भरपाई दिली जाणार असल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.
आमदार थोपटे यांनी वेल्हे तालुक्यातील वाजेघर, लव्ही आवळी, दादवडी, मेरावणे, फणशी, साखर, घावर, चिरमोडी, सुरवड, भागिनघर, मंजाईआसनी, दामगुडाअसनी, कोदवडी, वडगावझांजे सोडे या गावांत प्रचार दौरा केला. या वेळी ते देवपाल येथे बोलत होते.
या वेळी सभापती सविता वाडघरे, दिलीप लोहकरे, चंद्रकांत शेडकर, सुषमा रेणुसे, वसुधा नलावडे, शोभा जाधव,गणपतराव रेणुसे, भाऊ दसवडकर, बाळासो शिळीमकर, माऊली खाटपे, शिवाजी येनपुरे, काळुराम पिलावरे, मोहन शिळीमकर, शिवाजी चहाटे, संतोष भोसले, सूर्यकांत भोसले, उत्तम रेणुसे, विलास रांजणे, बाळू भरम, भगवान शिदे, आण्णासो रांजणे उपस्थित होते.
थोपटे म्हणाले, की सुमारे ५ कोटी रुपये किमतीच्या देवपाल लघुपाटबंधाऱ्यामुळे ५० दशलक्ष घन मीटर पाणी साचणार आहे. शेतकऱ्यांचे भूसंपादनाचे प्रस्ताव शासनाकडे दाखल केले आहे. त्याचा मोबदला लवकरच मिळेल. बंधाऱ्याचे काम पूर्ण झाल्यावर डोंगरावर बंद पाइपने पाणी नेऊन सायफन पद्धतीने पाणी आणून शेती पिकवली जाणार आहे. त्यामुळे वीजबिल येणार नाही. बंधाऱ्याचे काम अंतिम टप्प्यात असून, लवरच त्याला मंजुरी मिळेल, असा विश्वास थोपटे यांनी व्यक्त केला.०

Web Title: 'Devpal' will leave a water question because of it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.