इंदापूर अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी देवराज जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:08 AM2021-07-03T04:08:26+5:302021-07-03T04:08:26+5:30
नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडीसाठी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक गुरुवार (दि. १ जुलै) झाली. या वेळी अध्यक्षपदासाठी देवराज जाधव ...
नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडीसाठी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक गुरुवार (दि. १ जुलै) झाली. या वेळी अध्यक्षपदासाठी देवराज जाधव (निमगाव केतकी) व उपाध्यक्षपदासाठी सत्यशील पाटील (वालचंदनगर) यांचे एकमेव अर्ज दाखल झाले होते.
त्यामुळे या दोघांच्या बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निबंधक जे. पी. गावडे यांनी केली.
या निवडीनंतर माजी मंत्री व बँकेचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते देवराज जाधव व सत्यशील पाटील या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
इंदापूर अर्बन बँक गेली अडीच दशके चांगल्या पद्धतीने कामकाज करीत असून, हजारो संसार प्रपंच पुढे करण्याचे काम बँकेने केले आहे. इंदापूर तालुक्यातील जनतेच्या दैनंदिन कामकाजाचा बँक ही एक अविभाज्य घटक बनलेली आहे, असे गौरवोद्गार या वेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
या वेळी बँकेचे संचालक रामकृष्ण मोरे, विलासराव माने, अशोक शिंदे, संदीप गुळवे, ॲड. विकास देवकर, दादाराम होळ, आदिकुमार गांधी, भागवत पिसे, अविनाश कोतमिरे, उज्ज्वला गायकवाड, डॉ. अश्विनी ठोंबरे, उल्हास जाचक, ॲड. विजय पांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. एस. तावरे उपस्थित होते.
०२ इंदापूर
नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करताना हर्षवर्धन पाटील व इतर.