पाढे पाठांतर स्पर्धेत देवयानी आरेकर राज्यात तृतीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:14 AM2021-08-18T04:14:11+5:302021-08-18T04:14:11+5:30

मॅप मॅजिक कॅम्युनिकेशनच्या वतीने राज्यस्तरीय अंकनाद पाढे पाठांतर - सन २०२१ ही स्पर्धा नुकतीच घेण्यात आली. या स्पर्धेत देवयानी ...

Devyani Arekar is third in the state in the distance recitation competition | पाढे पाठांतर स्पर्धेत देवयानी आरेकर राज्यात तृतीय

पाढे पाठांतर स्पर्धेत देवयानी आरेकर राज्यात तृतीय

Next

मॅप मॅजिक कॅम्युनिकेशनच्या वतीने राज्यस्तरीय अंकनाद पाढे पाठांतर - सन २०२१ ही स्पर्धा नुकतीच घेण्यात आली. या स्पर्धेत देवयानी अजय आरेकर या विद्यार्थिनीने सहभाग घेत तीसपर्यंत पाढे व संख्यांचे वर्ग तोंडपाठ सादर करून घवघवीत यश संपादन केले.

यशस्वी विद्यार्थिनीचा गावच्या वतीने खेड तालुका खरेदी - विक्री संघाचे संचालक पठाणराव वाडेकर, माजी शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर, सरपंच गणेश वाडेकर, उपसरपंच सत्यवान पानसरे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गुलाब वाडेकर, माजी चेअरमन पंकजबापू हरगुडे, पोलीस पाटील केशव साबळे, ग्रामपंचायत सदस्य अंकुश साबळे, मोहन खलाटे, शिवाजी आरेकर, अजय आरेकर, उपशिक्षिका तांबोळी आदी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी देवयानीच्या यशाचे कौतुक केले.

फोटो ओळ : बहुळ (ता.खेड) येथे देवयानी आरेकर या गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार करताना मान्यवर.

Web Title: Devyani Arekar is third in the state in the distance recitation competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.