पुणे | पाणी टंचाई आणि भरमसाठ बिलाचा निषेध करत उत्तमनगरमध्ये धडक हंडा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 06:07 PM2022-04-23T18:07:27+5:302022-04-23T18:08:16+5:30

शिवणे : शिवणे, उत्तमनगर, कोंढवे, कोपरे या गावातील पाणी टंचाई, कमी दाबाने पाणी पुरवठा व भरमसाट बिल याचा निषेध ...

dhadak handa morcha in uttamnagar protesting against water scarcity and huge bills | पुणे | पाणी टंचाई आणि भरमसाठ बिलाचा निषेध करत उत्तमनगरमध्ये धडक हंडा मोर्चा

पुणे | पाणी टंचाई आणि भरमसाठ बिलाचा निषेध करत उत्तमनगरमध्ये धडक हंडा मोर्चा

googlenewsNext

शिवणे : शिवणे, उत्तमनगर, कोंढवे, कोपरे या गावातील पाणी टंचाई, कमी दाबाने पाणी पुरवठा व भरमसाट बिल याचा निषेध करण्यासाठी उत्तमनगर येथे धडक हंडा मोर्चा काढण्यात आला होता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजना ही पुणे म.न.पा कडे त्वरित समाविष्ट व्हावी व पाण्याचा भेडसावणारा प्रश्न मार्गी लागावा यासाठी शनिवारी (२३ एप्रिल) सकाळी १०.०० वाजता मोर्चा काढला होता.

अहिरेगेट शिवणे ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, कोंढवे धावडेपर्यंत धडक हंडा मोर्चाचे आयोजन केले होते ज्यामध्ये चारही गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या आंदोलनामध्ये आमदार भीमराव तापकीर, सुशील मेंगडे, किरण बारटक्के,  वृषाली चौधरी, अरुण दांगट, वासुदेव भोसले, पंचायत समिती सदस्या उषा नाणेकर, स्मिता धावडे, शिल्पा जोशी, सवर्ण ढगे, भारती वांजळे, उमेश पाटील, प्रवीण दांगट, सुभाष शिंदे, प्रकाश साळवी, संदीप देशमुख, सुरेश नाणेकर, सचिन कांबळे, भगवान मोरे, मोहन गायकवाड, बबन शेलार, रवी कदम, विजय इंगळे आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

चारही गावांना पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी गेली ४ वर्ष पाठपुरावा करत आहे परंतु, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि मनपा ह्यांच्या वादात नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत होते. शेवटी हंडा मोर्चा काढावा लागला. यानंतरही पाण्याचे नियोजन झाले नाही तर मनपावर भव्य मोर्चा काढण्यात येईल.

-सुभाष नानेकर

Web Title: dhadak handa morcha in uttamnagar protesting against water scarcity and huge bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.