धमाल दांडिया स्पर्धा २०१६
By Admin | Published: October 7, 2016 03:18 AM2016-10-07T03:18:03+5:302016-10-07T03:18:03+5:30
लोकमत सखी मंच दांडिया व सखींचे नाते अतूट आहे. नवरात्रामध्ये दांडिया आवर्जून खेळल्या जातात. सखी व दांडिया यांच्या नात्याला एक वेगळा टच देण्याचा प्रयत्न लोकमत सखी मंच
पुणे : लोकमत सखी मंच दांडिया व सखींचे नाते अतूट आहे. नवरात्रामध्ये दांडिया आवर्जून खेळल्या जातात. सखी व दांडिया यांच्या नात्याला एक वेगळा टच देण्याचा प्रयत्न लोकमत सखी मंच आणि नारायणदास फौंडेशन अॅन्ड प्रतीक नितीन गुजराथी ग्रुप यांच्यातर्फे करण्यात येत आहे. यानिमित्त रास दांडिया आणि ग्रुप दांडिया स्पर्धेचे आयोजन कृष्ण सुंदर लॉन्स, म्हात्रे पूल येथे ७ आॅक्टोबर रोजी करण्यात आले आहे. ग्रुप दांडिया स्पर्धा ५.३० ते ७.०० या वेळेत घेण्यात येतील व त्यानंतर रास दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत सखी मंच नेहमीच महिलांच्या कला-गुणांना वाव देण्याचं, प्रोत्साहन देण्याचं काम करते. विविध उपक्रमांतून महिलांच्या सबलीकरणावर भर देण्याचा प्रयत्न या मंचाच्या वतीने करण्यात येतो.तसेच भारतीय परंपरा जपण्यासाठी लोकमत सखी मंच नेहमीच पुढाकार घेत असते.याच उपक्रमाचा भाग म्हणून महिलांना दांडियाचे योग्य प्रशिक्षण मिळावे,त्यांना या खेळाचा आनंद लुटता यावा, या उद्देशाने हे दांडिया प्रशिक्षण देण्यात आले होते व आता रास दांडिया आणि ग्रुप दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत पुण्यातील दांडिया संघ सहभाग घेऊ शकतील. विजयी संघांना बक्षीस देऊन गौरविण्यात येईल.
प्रथम येणाऱ्या संघाला विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळेल. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता प्रत्येक चमूमध्ये १५ वर्षांवरील किमान ७ व्यक्तीच्या गटात समावेश असावा. हा गट पुरुष, महिला अथवा मिश्र कुठलाही चालेल. प्रत्येक गटाला ५ मिनिट वेळ देण्यात येईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. (प्रतिनिधी)