ढमाले मळ्यात बिबट्या अडकला पिंजऱ्यात

By Admin | Published: February 14, 2015 10:53 PM2015-02-14T22:53:20+5:302015-02-14T22:53:20+5:30

ढमाले मळा येथे वनविभागाकडून शुक्रवारी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या (मादी) रात्री साडेनऊच्या सुमारास पिंजऱ्यात अडकला.

In the Dhamale mudra leopard stuck cage | ढमाले मळ्यात बिबट्या अडकला पिंजऱ्यात

ढमाले मळ्यात बिबट्या अडकला पिंजऱ्यात

googlenewsNext

मढ : ढमाले मळा येथे वनविभागाकडून शुक्रवारी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या (मादी) रात्री साडेनऊच्या सुमारास पिंजऱ्यात अडकला. या वेळी बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
उदापूरचे वनरक्षक एस. जी. मोमीन यांनी सांगितले, की उदापूर, मांदारणे, अहिनवेवाडी, गोटीशीवार, सारणी या परिसरात वारंवार दुचाकीचालकांवर बिबट्याकडून हल्ले होत होते. त्यामुळे वनविभागाकडून पाहणी करून पिंजऱ्याची जागा वारंवार बदलली जात असे. त्यानुसारच गुरुवारी (दि. १२) ढमाले मळा येथे रात्री बिबट्याने हल्ला केल्याने शीतल जगताप या जखमी झाल्या होत्या. त्यामुळे वनविभागकडून ढमाले मळा येथे पाहणी करून शुक्रवारी (दि. १३) नितीन अहिनवे यांच्या शेतात पिंजरा लावून त्यात सावज म्हणून मेंढी ठेवली होती. त्याच रात्री साडेनऊला बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार वनपाल एस. बी. महाले, एस. डी. वायभासे, सी. एस. कांबळे, एन. एम. खताळ व वनरक्षक एस. मोमीन, सी. नलावडे, के. एस. नायकोडी, जाधव, पारधी, केदार, गुफेकर, गंवादे घटनास्थळी पोहोचले.
या बिबट्यास माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रात रात्रीच हलवण्यात आले. बिबट्या मादी जातीचा असून बिबट्याचे बछडे तेथेच फिरत असावेत, म्हणून परत त्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला आहे. पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या अंदाजे चार वर्षांचा आहे. (वार्ताहर)

आतापर्यंत तीन महिला जखमी
४सुनीता गणेश महाकाळ, बाळासाहेब बबन महाकाळ, शीतल जगताप यांना या परिसरात बिबट्याने आतापर्यंत जखमी केले होते. त्यामुळे उदापूर, ढमाले मळा, मांदारणे, अहिनवेवाडी, सारणी, गोटीशिवार या परिसरात बिबट्याची दहशत होती.
बछड्यांसाठी लावला पिंजरा...
४बिबट्या मादी जातीचा असून बिबट्याचे बछडे तेथेच फिरत असावेत, म्हणून परत त्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला आहे.
वनविभागाचे नागरिकांकडून अभिनंदन
४गुरुवारी रात्री एका महिलेवर बिबट्याने हल्ला केला. त्या स्थळाची पाहणी करून शुक्रवारीच पिंजऱ्याची जागा बदलली व त्याच रात्री बिबट्या जेरबंद झाला. त्यामुळे नागरिकांकडून वनविभागाचे अभिनंदन केले जात आहे.

 

Web Title: In the Dhamale mudra leopard stuck cage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.