धामणीची खंडाेबाची यात्रा यंदा साधेपणाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:15 AM2021-02-17T04:15:41+5:302021-02-17T04:15:41+5:30

धामणी गावची ऐतिहासिक आणि संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणारी कुलस्वामी कुलदैवत म्हाळसाकांत खंडोबाच्या यात्रेची बैठक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धामणी येथे पार ...

Dhamani's journey to Khandaeba is simple this year | धामणीची खंडाेबाची यात्रा यंदा साधेपणाने

धामणीची खंडाेबाची यात्रा यंदा साधेपणाने

Next

धामणी गावची ऐतिहासिक आणि संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणारी कुलस्वामी कुलदैवत म्हाळसाकांत खंडोबाच्या यात्रेची बैठक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धामणी येथे पार पडली.

त्यामध्ये मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे म्हणाले, यात्रेमध्ये फक्त कुलधर्म कुलाचार पार पडतील. परंतु मोठ्या प्रमाणात न करता ठराविक लोकांमध्ये कार्यक्रम करावा. पाळणे, हॉटेल, खेळणी, तमाशा इतर कुठल्याही गोष्टीला परवानगी मिळणार नाही.

सालाबादाप्रमाणे देवाची वर्गणी गोळा करायचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. ही वर्गणी ही योग्य ठिकाणी वापरण्यात येणार आहे, असा ग्रामस्थांनी एकमुखाने निर्णय घेतला.

या नंतर प्रांत आणि तहसीलदार यांच्या उपस्थितीत अंतिम निर्णय होणार आहे. पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, सरपंच सागर जाधव, यात्रा कमिटीचे अध्यक्ष गजाराम जाधव पाटील, पोलीस अधिकारी विनोद गायकवाड आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो धामणी येथे कोरोना पार्श्वभूमीवर यात्रेविषयी मार्गदर्शन करताना मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे.

Web Title: Dhamani's journey to Khandaeba is simple this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.