धनगर समाजाच्यावतीने बंद पाळण्यात येणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 01:37 AM2018-08-13T01:37:08+5:302018-08-13T01:37:17+5:30
अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळविण्यासाठी सध्या धनगर समाज आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. १३) महाराष्ट्र बंदची काही संघटनांनी हाक दिली होती.
बारामती -अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळविण्यासाठी सध्या धनगर समाज आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. १३) महाराष्ट्र बंदची काही संघटनांनी हाक दिली होती. याबाबतचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या पार्श्वभूमीवर बारामती येथे धनगर समाजाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यामध्ये सोमवारी धनगर समाजाच्यावतीने कोणताही बंद पाळण्यात येणार नसल्याची घोषणा करण्यात आली.
याबाबत धनगर प्रबोधन संघाचे अध्यक्ष गोविंद देवकाते यांनी माहिती दिली. अधिक माहिती देताना देवकाते म्हणाले, की महाराष्ट्र बंदची हाक काही संघटनांनी दिली होती. बारामतीतदेखील बंद होणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे नागरिक, व्यापाºयांमध्ये संभ्रम होता. मात्र, बारामतीत कोणत्याही नेतेमंडळींनी, आरक्षण कृती समितीने बंद पुकारला नव्हता. त्यामुळे समाजाच्या बैठका घेण्यात आल्या. पोलीस ठाण्यातदेखील बैठक पार पडली. त्यामध्ये बंद पाळायचा नाही, यावर निर्णय झाला आहे.
मराठा आरक्षण आंदोलन, सरकारी कर्मचारी आंदोलन, दूधदरवाढ आंदोलन येणाºया सणासुदीच्या दिवसामध्ये सर्वसामान्यांची गैरसोय होऊ नये, या सामाजिक भावनेतून बारामतीतील धनगर समाजातील नेतेमंडळींनी हा बंद पाळायचा नाही, असा निर्णय घेतला.
यावेळी बैठकीसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, मदनराव देवकाते, दत्तात्रय येळे, बाळासाहेब कोळेकर, बाळासाहेब पाटील, अॅड. जी. बी. गावडे,
किशोर मासाळ, गुलाबराव
गावडे, नीलेश धालपे,
अभिजित देवकाते, नितीन देवकाते, नवनाथ मलगुंडे, पंकज देवकाते आदी उपस्थित होते.