Video : महाराजांबद्दल धनंजय मुंडे प्रचंड आशावादी, उदयनराजेंबद्दल म्हणाले 'राष्ट्रवादी'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 07:36 PM2019-09-12T19:36:26+5:302019-09-12T19:37:47+5:30

उदयनराजे यांचा भाजपमधील पक्षप्रवेश रखडला असल्याची चर्चा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच ते वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटले होते.

Dhananjay Munde is extremely optimistic, Udayan Raje bhosale never join bjp | Video : महाराजांबद्दल धनंजय मुंडे प्रचंड आशावादी, उदयनराजेंबद्दल म्हणाले 'राष्ट्रवादी'

Video : महाराजांबद्दल धनंजय मुंडे प्रचंड आशावादी, उदयनराजेंबद्दल म्हणाले 'राष्ट्रवादी'

Next

पुणे : भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असलेले राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे आज सकाळी 10 वाजता पुण्यातील शरद पवार यांच्या निवासस्थानी गेले आहेत. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि शशिकांत शिंदेही उपस्थित होते. या बैठकीनंतर धनंजय मुंडेंनी पत्रकारांशी संवाद साधून उदयनराजेंच्या भाजपा प्रवेशाचे वृत्त नाकारले आहे. उदयनराजे आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने बैठकीला आले होते, असे मुंडेंनी सांगितले आहे. 

उदयनराजे यांचा भाजपमधील पक्षप्रवेश रखडला असल्याची चर्चा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच ते वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांना भेटले होते. तसेच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनीही गुप्त बैठक घेत त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे उदयनराजे राष्ट्रवादीत राहणार की भाजपात जाणार याबाबत चर्चा रंगल्या होत्या. धनंजय मुंडेंनी उदयनराजेंच्या प्रवेशाबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. ''महाराज हे राष्ट्रवादी पक्षाचे खासदार असून ते नेहमीच पवारसाहेबांना भेटतात. आजही आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने पक्षाचा प्रचार-प्रसार याबाबत महाराज आणि पवारसाहेब यांच्यात चर्चा झाली आहे. पक्षांतराबद्दल स्वत: महाराजांची कुठंही चर्चा केली नाही, भाजपाने जाणीवपूर्वक आपल्या गोटातून ही चर्चा घडवून आणली आहे. जनतेला वेगळीकडं डायव्हर्ट करण्यासाठी भाजपा अशा खोड्या करत आहे,'' असे धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे. तसेच, शिवस्वराज्य यात्रेला हजर नसण्याचे कारण हे वैयक्तिक असून त्यांच्यामागे व्यापक काम होते, असे मुंडेंनी म्हटले आहे. 

दरम्यान, उदयनराजे हे आज पवार यांच्या शिवाजीनगरमधील निवासस्थानी गेले आहेत. त्यांच्यासोबत धनंजय मुंडेदेखील उपस्थित असून बैठकीत काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. उदयनराजे यांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे, खासदार अमोल कोल्हे त्याचबरोबर राजू शेट्टी यांनीही प्रयत्नही केला होता. आता ते थेट पवार यांच्या भेटीनंतर त्यांच्या पक्ष प्रवेशाला ब्रेक लागणार का, याबाबत उत्सुकता आहे. त्यातच, धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं स्पष्टीकरण दिलंय. 

Web Title: Dhananjay Munde is extremely optimistic, Udayan Raje bhosale never join bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.