धनंजय मुंडे स्वतःहून मला म्हणतील, 'पम्मी तुम जिती मै हारा' तेव्हाच मला न्याय मिळेल - करुणा मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 08:16 PM2022-01-13T20:16:19+5:302022-01-13T20:16:28+5:30

धनंजय मुंडे विरोधात निवडणूक लढविली. नवरा विरुद्ध बायको अशी ही लढत असेल.

dhananjay munde himself will say to me i quit then I will get justice karuna munde | धनंजय मुंडे स्वतःहून मला म्हणतील, 'पम्मी तुम जिती मै हारा' तेव्हाच मला न्याय मिळेल - करुणा मुंडे

धनंजय मुंडे स्वतःहून मला म्हणतील, 'पम्मी तुम जिती मै हारा' तेव्हाच मला न्याय मिळेल - करुणा मुंडे

Next

पुणे : मला अजूनही न्याय मिळाला नाही. पण मी समाधानी आहे. माझे पती जेव्हा स्वतः हुन माझ्याजवळ आणि मिडियासमोर येतील आणि 'पम्मी, तुम जिती मै हारा' असं जेव्हा म्हणतील, शपथविधीमध्ये जेव्हा ते माझं नाव घेतील तेव्हाच मला न्याय मिळाला असं मी समजेन, असं करुणा धनंजय मुंडे यांनी सांगितले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. 

करुणा धनंजय मुंडे यांनी आज पुण्यात एका कामगार संघटनेत प्रवेश केला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. काही दिवसांपूर्वी करुणा मुंडे यांनी एका राजकीय पक्षाची स्थापना केली. त्यानंतर राज्यभरात पक्षाचा विस्तार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, माझ्या पक्षाचा नारा वेगळा आहे.. कार्यकर्ता समोर असेल आणि त्याच्या पाठीमागे करुणा मुंडे असतील. निवडणूक लढवण्याची वेळ आली तर आधी कार्यकर्त्यांना उमेदवारी देईन. माझ्यावर निवडणूक लढवण्याची वेळ आलीच तर परळी गावातून आमदारकीची निवडणूक लढवेन. धनंजय मुंडे विरोधात निवडणूक लढविली. नवरा विरुद्ध बायको अशी ही लढत असेल. 

आतापर्यंत न्याय मिळाला नाही, मी स्वतः न्याय मिळवून घेतला

धनंजय मुंडेंना मी जेव्हा पहिल्यांदा भेटले तेव्हा मी सोळा वर्षाची होते. ही जास्त काही बोलणार नाही असं म्हणून त्यांनी मला या प्रकरणात ढकललं. ही कुणाला काही बोलणार नाही, काही दिवस फडफडेल आणि घरात शांत बसून राहील असं त्यांना वाटलं असावं. परंतु देवाला काही वेगळेच मंजूर होते. मी आता माझा स्वतःचा पक्ष स्थापन केला. त्यानंतर माझं धनंजय मुंडेंशी बोलणं झालं. मी खूप चांगलं करते अस देखील त्यांनी मला सांगितलं. मला त्यांच्याकडून आतापर्यंत न्याय मिळाला नाही, मी स्वतः न्याय मिळवून घेतला. 1998 पासून मी भारतीय जनता पक्षात होते. पाच महिने मी पक्षाचं काम केलं. मी बाहेर जाणं माझ्या नवऱ्याला आवडत नसल्यामुळे मी पक्ष सोडून दिला आणि घरात बसले. परंतु मी आता पुन्हा राजकारणात आले आहे.

Web Title: dhananjay munde himself will say to me i quit then I will get justice karuna munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.