कासुर्डी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी धनश्री टेकवडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:12 AM2021-02-13T04:12:59+5:302021-02-13T04:12:59+5:30
थोरात गटाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने कासुर्डी ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजेंद्र वाघ , ग्रामसेवक ...
थोरात गटाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने कासुर्डी ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजेंद्र वाघ , ग्रामसेवक राजेंद्र जगताप, गावकामगार तलाठी गौरी दाभाडे यांनी काम पाहिले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य धनश्री टेकवडे, दिलीप आखाडे, अशोक सोनवणे, संतोष माकर, अलका ठोंबरे, मंगल वीर, सुनीता कसबे, कल्पना भालेराव, मनीषा आखाडे, सुरेखा गायकवाड, तानाजी राजवडे, बापू जगताप, दत्तात्रय आखाडे उपस्थित होते.
सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडी ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिरासमोर विजयी सभा घेण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी सरपंच धनश्री टेकवडे व उपसरपंच दिलीप आखाडे यांचा सत्कार केला. ग्रामस्थांनी व विजयी पदाधिकाऱ्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. या वेळी माजी पंचायत समिती सदस्य दौलत ठोंबरे, तुकाराम भोंडवे , बाळासो टेकवडे , गणपत आखाडे , हिम्मत गायकवाड , बबन काळभोर , हनुमंत आखाडे , पांडुरंग आखाडे , बाबासाहेब चौंडकर , मयूर आखाडे , दीपक आखाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, टेकवडे कुटुंब एकेकाळी दौंड तालुक्यातील राजकीय वर्तुळात महत्त्वाचे सत्ताकेंद्र होते. मात्र मागील ३० वर्षांत त्यांच्या घरात महत्त्वाचे सत्ताकेंद्र मिळू शकले नव्हते. आता कै. तात्यासाहेब टेकवडे यांच्या नातसून धनश्री विशाल टेकवडे यांनी सरपंचपद मिळवून कासुर्डी गावातील सत्ताकेंद्र टेकवडे कुटुंबात आणले आहे.
१२ यवत कासुर्डी
सरपंचपदी धनश्री टेकवडे व उपसरपंचपदी दिलीप आखाडे यांची निवड झाल्यानंतर जल्लोष करताना पदाधिकारी व ग्रामस्थ.