करंजे ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचारप्रकरणी धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:12 AM2021-09-23T04:12:38+5:302021-09-23T04:12:38+5:30
गटविकास अधिकारी व बारामती शहर पोलीस यांनी गेली ७ महिन्यांपासून ग्रामपंचायत करंजेमध्ये झालेल्या गैरव्यवहार व अपहारप्रकरणी वारंवार तक्रारी देऊनही ...
गटविकास अधिकारी व बारामती शहर पोलीस यांनी गेली ७ महिन्यांपासून ग्रामपंचायत करंजेमध्ये झालेल्या गैरव्यवहार व अपहारप्रकरणी वारंवार तक्रारी देऊनही सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कारवाई होत नसल्याने हे आंदोलन सुरू केले असल्याची माहिती राकेश गायकवाड यांनी दिली.
गायकवाड म्हणाले की, करंजे येथील ग्रामसेवक व सरपंच यांनी शासकीय निधीचा गैरवापर व नियमांची पायमल्ली करून अपहार केला आहे. याबाबत पंचायत समिती कार्यालयाने त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. फौजदारी गुन्हा दाखल करून अतिक्रमणाची चौकशी करण्याची मागणी करूनही यावर काहीही उपाययोजना होत नाही.
आंदोलनाला शिवसेना तालुका प्रमुख विश्वास मांढरे, उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब शिंदे, विधान सभाक्षेत्र प्रमुख नीलेश मदने, युवासेना तालुका प्रमुख निखिल देवकाते, उपतालुका प्रमुख दिग्विजय जगताप, विभाग प्रमुख दीपक काशीद, पपू माने, करंजेचे माजी उपसरपंच बुवासाहेब हुंभरे, करंजे गावातील तरुणांनी पाठिंबा दिला.