धीरज घाटे हल्ल्याचा कट: तिघांना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:16 AM2021-09-09T04:16:50+5:302021-09-09T04:16:50+5:30
पुणे : भाजपचे नगरसेवक धीरज घाटे यांचा खून करण्याचा कट रचून इतर साथीदारांच्या मदतीने प्रत्यक्ष हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ...
पुणे : भाजपचे नगरसेवक धीरज घाटे यांचा खून करण्याचा कट रचून इतर साथीदारांच्या मदतीने प्रत्यक्ष हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
विकी ऊर्फ वितुल वामन क्षीरसागर (वय ३३, रा. सानेगुरुजीनगर, अंबील ओए कॉलनी), मनोज संभाजी पाटोळे (वय ३३, रा. साने गुरुजीनगर) आणि महेश इंद्रजीत आगलावे (वय २५, रा. लोहियानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
आगामी महापालिका निवडणुकीत विकी क्षीरसागर याचा भाऊ राकेश क्षीरसागर हा सहज निवडून यावा, याकरिता विकी क्षीरसागर व मनोज पाटाेळे यांनी इतरांच्या मदतीने कट रचला. प्रत्यक्ष शेफ्रॉन हॉटेल येथे घाटे हे गेले असताना त्यांच्यावर तीन जणांनी पाळत ठेवली होती. घाटे यांच्या तक्रारीनंतर गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने तिघांना अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. या गुन्ह्यातील राहुल शेडगे व निखिल मोहिते हे फरार आहेत. या कटाचा सूत्रधार कोण आहे. महेश आगलावे व फरार आरोपींच्याकडे हॉटेलमध्ये काळी बॅग हाेती. ती बॅग हस्तगत करायची आहे. त्या बॅगेत काय होते, याचा तपास करायचा असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. आरोपीतर्फे ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी हा गुन्हा बनावट व खोटा असून पालिका निवडणुका लक्षात घेऊन दाखल केला आहे. केवळ संशयाच्या आधारावर आरोपींविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे.