ढोल-ताशा पथकांना ‘सामाजिक बांधिलकी’चा नाद

By admin | Published: July 8, 2017 02:37 AM2017-07-08T02:37:06+5:302017-07-08T02:37:06+5:30

सार्वजनिक गणेशोत्सवात जल्लोषात ढोलपथके आपल्या वादनाने आसमंत दुमदुमून सोडतात. या पथकांचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे

Dhol Tasha teams' passion for social bandhilakica | ढोल-ताशा पथकांना ‘सामाजिक बांधिलकी’चा नाद

ढोल-ताशा पथकांना ‘सामाजिक बांधिलकी’चा नाद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सार्वजनिक गणेशोत्सवात जल्लोषात ढोलपथके आपल्या वादनाने आसमंत दुमदुमून सोडतात. या पथकांचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे पथकांमध्ये सामावलेली संघटनेची मोठी ताकद आहे. या पथकांच्या एका छताखाली ही सर्व तरुणाई आपल्या छंदात रममाण होते. पण या काही महिन्यांच्या सराव कालखंडानंतर वा उत्सवानंतर ही सर्व मंडळी कधी एकत्र येतात का? असा सहज प्रश्न मनाला भिडतो आणि पावले जेव्हा याचे उत्तर शोधण्यासाठी या पथकांकडे वळतात आणि त्यातून समोर येते ढोलताशा पथकांच्या सामाजिक बांधिलकीच्या मोहिमेतले अभूतपूर्व योगदान.
दिवसेंदिवस समाजातील माणुसकी संपत चालल्याचे प्रसंग समोर घडत असताना आणि प्रत्येकामधील वाढत्या आत्मकेंद्री स्वभावाच्या पार्श्वभूमीवर हे ढोलपथकांच्याद्वारे उभे राहिलेले सामाजिक कार्याचे चित्र समाजाला आदर्शदायी व सुखावह आहे. या ढोलपथकाच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न व मनुष्यबळ यांचा संयोग घडवत ही ढोलपथके अनेक सामाजिक उपक्रम खेडेगावात, वाड्यावस्त्यांवर, तसेच शहरातील झोपडपट्टी, दुर्लक्षित भागात सक्रियतेने करताना दिसतात. काही मित्रांनी फेसबुकवर त्यांच्या ढोलपथकांनी केलेले रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप आदी उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. या ढोलपथकांवर सरावाच्या दरम्यान जी काही अन्यायकारक कारवाई केली जाते, त्याला हे कार्य चपखल उत्तर आहे. ही तरुणाई एरवी पेन वा छोटीशी आपली गोष्टही कुणाला देणार नाही. कुठे दिसो वा नसो; पण या पथकांच्या उपक्रमात हे हमखास सहभागी होताना दिसतात.

वेल्ह्याच्या पुढे एका खेडेगावातील पाणीप्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने आमच्या रमणबाग व इतर काही पथके मिळून विहीर खोदण्याचे कार्य दोन वर्षांपासून सुरू केले आहे. दुष्काळाच्या वेळी पथकांतर्फे डाळींसह विविध प्रकारचे धान्य त़्या भागात पोहोचविण्याचे काम आम्ही करण्याचा प्रयत्न केला. वृक्षारोपणाने ही मोठी चळवळ राबविली जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात खूप आनंद या सामाजिक कार्यातून मिळतो.
- महेश लिमये, रमणबाग ढोल पथक

स्वरुपवर्धिनीद्वारे वर्षभर गरजू विद्यार्थ्यांना शिकविण्याचा उपक्रम राबविला जातो. विविध प्रसंगी स्त्रीभ्रूणहत्या, दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दहशतवाद आदी सामाजिक प्रश्नांवरील पथनाट्येही सादर केली जातात. रक्तदान शिबिरेही आयोजित केली जातात.
- ज्ञानेश पुरंदरे, स्वरुपवर्धिनी पथक

Web Title: Dhol Tasha teams' passion for social bandhilakica

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.