बारामतीच्या अवलिया रिक्षावाल्याच्या ठसकेबाज लावणीची सोशल मीडियावर धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:12 AM2021-03-07T04:12:04+5:302021-03-07T04:12:04+5:30

डोर्लेवाडी : लावणीनृत्यावर महिला नृत्यांगणांना लाजविणाऱ्या बारामती शहरातील अवलिया रिक्षावाल्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. बाबाजी कांबळे ...

Dhoom of Awaliya rickshaw puller of Baramati on social media | बारामतीच्या अवलिया रिक्षावाल्याच्या ठसकेबाज लावणीची सोशल मीडियावर धूम

बारामतीच्या अवलिया रिक्षावाल्याच्या ठसकेबाज लावणीची सोशल मीडियावर धूम

Next

डोर्लेवाडी : लावणीनृत्यावर महिला नृत्यांगणांना लाजविणाऱ्या बारामती शहरातील अवलिया रिक्षावाल्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. बाबाजी कांबळे असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. शहरात पानगल्लीत रिक्षाथांब्यावर कांबळे असतात. कांबळे या रिक्षाचालकाने ‘वाजले की बारा’ या लावणीवर नृत्य सादर केले आहे.

मित्रांच्या आग्रहातून कांबळे यांनी त्यांची कला सादर केली. नृत्य सादर करताना मित्रांनीच त्यांचे मोबाइलवर चित्रीकरण केले. तसेच त्याचा व्हिडीओ व्हायरल केला. हा व्हिडीओने सोशल मीडियावर शेअर केल्यावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.

बाबाजी कांबळे यांच्या या व्हिडीओच्या फेसबुकवरील पोस्टवर लोकप्रिय लयभारी या पेज वर लाइक, कमेंटचा पाऊस पडत आहे. कांबळे यांचा व्हिडीओ महाराष्ट्रातील सर्वाधिक पसंतीचा व्हिडीओ ठरू पाहत आहे. व्हिडीओ शेअर होताच महाराष्ट्रातून याच्या लावणीवर कमेंटचा पाऊस पडत आहे. दर पाच मिनिटाला त्याच्या व्हिडीओ पाहणाऱ्यांची संख्या लाखांत पोहचली आहे.

बाबाजी कांबळे हा तरुण बारामती शहरापासून अवघ्या दोन किमीवर असलेल्या गुणवडी गावाचा तो विद्यमान सदस्यदेखील आहे. हरहुन्नरी स्वभाव असलेल्या बाबाजीची कला सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रथमच पुढे आली आहे.

बारामतीच्या बाबाजीची ही कला महाराष्ट्रभर लोकप्रिय ठरली आहे. या रिक्षाचालकाने एखाद्या लावणी सम्राज्ञीला लाजवेल, अशी दमदार लावणी सादर केली आहे.

-------------------------------

Web Title: Dhoom of Awaliya rickshaw puller of Baramati on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.