लोणावळ्यात दोन ठिकाणी धूम स्टाइलने चोरी; दुचाकीवरून येऊन पळविले महिलांचे दागिने

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 12:15 PM2023-03-15T12:15:44+5:302023-03-15T12:16:36+5:30

दुचाकी गाडीवरून आलेल्या अनोळखी व्यक्तींनी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेऊन पळून गेले....

Dhoom style theft at two places in Lonavala; They came on a bike and stole women's jewelry | लोणावळ्यात दोन ठिकाणी धूम स्टाइलने चोरी; दुचाकीवरून येऊन पळविले महिलांचे दागिने

लोणावळ्यात दोन ठिकाणी धूम स्टाइलने चोरी; दुचाकीवरून येऊन पळविले महिलांचे दागिने

googlenewsNext

लोणावळा (पुणे) : लोणावळ्यात सोमवारी दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास खंडाळा व वलवण भागात धूम स्टाइलने चोरीचे प्रकार घडले आहेत. दोन्ही ठिकाणी दुचाकी गाडीवरून आलेल्या अनोळखी व्यक्तींनी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेऊन पळून गेले.

पहिल्या घटनेत सुशीला बाळू भगत (६०, रा. वलवण लोणावळा) यांनी फिर्याद दिली आहे. दुपारी तीनच्या सुमारास वलवण गावच्या हद्दीत हिंदुस्थान हार्डवेअरच्या पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला असणाऱ्या रस्त्यावरून भगत जात असताना समोरून अचानक दोन अनोळखी व्यक्ती काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर येऊन महिलेच्या गळ्यातील दोन तोळे ६ ग्रॅम वजनाची सोन्याची दोन पदरी माळ हिसकावून नेली. तर दुसरी घटना ही खंडाळा बॅटरी हिल परिसरात घडली.

ड्युक्स हाॅटेलसमोर पेरू विकणाऱ्या सविता रवींद्र पोशिरे (२५, रा. बॅटरी हिल खंडाळा) यांच्या जवळ दुचाकी गाडीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचा मिनी गंठण जबरदस्तीने हिसकावून चोरून नेले. एकाच दिवशी भरदिवसा चोरीच्या या दोन घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या दोन्ही घटनांप्रकरणी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पोवार व पोलिस उपनिरीक्षक मुजावर हे तपास करीत आहेत. दरम्यान, दोन्ही घटनांच्या परिसरातील तसेच हायवेवरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे काम सुरू आहे.

Web Title: Dhoom style theft at two places in Lonavala; They came on a bike and stole women's jewelry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.