ध्रुव प्रतिष्ठानच्या वतीने भोर तालुक्यातील तमाशा कलावंतांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:10 AM2021-04-24T04:10:36+5:302021-04-24T04:10:36+5:30

खऱ्या अर्थाने आपल्या कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम करणारे तमाशा कलावंत कोरोनासारख्या साथीच्या आजारामुळे व त्यावर शासनाकडून असलेल्या बंधनामुळे यात्रा ...

Dhruv Pratishthan helps Tamasha artists in Bhor taluka | ध्रुव प्रतिष्ठानच्या वतीने भोर तालुक्यातील तमाशा कलावंतांना मदत

ध्रुव प्रतिष्ठानच्या वतीने भोर तालुक्यातील तमाशा कलावंतांना मदत

googlenewsNext

खऱ्या अर्थाने आपल्या कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम करणारे तमाशा कलावंत कोरोनासारख्या साथीच्या आजारामुळे व त्यावर शासनाकडून असलेल्या बंधनामुळे यात्रा उरूस बंद असल्याने तमाशामालक व कलावंत यांच्यावर उपासमार चालू आहे. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी ध्रुव प्रतिष्ठान धावून आले.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीवजी केळकर यांच्या लक्षात आल्याबरोबर त्यांनी भोर तालुक्यातील तमाशा फडमालक यांची भेट घेऊन भोर तालुक्यातील संजयनगर, हरदेवनगर, महुडे, वेळवंड, कांबरे येथील १४४ महिला व पुरुष कलाकारांना अन्नधान्याचे किट, कपडे, व प्रत्येक तमाशा मंडळला प्रत्येकी आठ हजार रुपये अशी मदत केली.

यावेळी ध्रुव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव केळकर, सचिन देशमुख, सुभाष भेलके, महेश शेटे, नीलेश खरमरे, राहुल खोपडे, शेखर भडाळे उपस्थित होते यांनी वाघू गायकवाड, चंदर गायकवाड, महेंद्र गायकवाड, मारुतराव खुडे, बबनराव खुडे, सुदाम खुडे, मनीषा जावळेकर, सीता कुदळे, वैशाली जावळेकर उपस्थित होते.

--

दीडशे पुरुष व पन्नास महिलांची उपासमार

सध्या भोर तालुक्यात महुडे येथे दोन, वेळवंड दोन, कांबरे एक व वेल्हा येथील वांजळे येथे दोन पारंपरिक तमाशा फड असून, त्याच्या माध्यमातून २०० लोकांना रोजगार मिळत होता. १५० पुरुष व ५० महिला कलाकार आपला उदरनिर्वाह करत होते. परंतु कोरोनामुळे त्यांच्या वाट्याला दुर्भाग्य आले असून सर्व तमाशा फड कोलमडून पडले.

--

फोटो क्रमांक -२३ महुडे तमाशा कलावंत

फोटो - ध्रुव प्रतिष्ठानच्या वतीने तमाशा कलावंताना अन्नधान्य किट देताना राजीव केळकर.

Web Title: Dhruv Pratishthan helps Tamasha artists in Bhor taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.