पुण्याकडून धुळ्याचा पराभव

By admin | Published: May 3, 2017 02:50 AM2017-05-03T02:50:58+5:302017-05-03T02:50:58+5:30

इशा घारपुरे, सई जगताप व सुधीक्षा नायर यांच्या उत्कृष्ट खेळामुळे पुणे मुलींच्या संघाने ३४ व्या महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा यूथ बास्केटबॉल

Dhule defeated from Pune | पुण्याकडून धुळ्याचा पराभव

पुण्याकडून धुळ्याचा पराभव

Next

पुणे : इशा घारपुरे, सई जगताप व सुधीक्षा नायर यांच्या उत्कृष्ट खेळामुळे पुणे मुलींच्या संघाने ३४ व्या महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा यूथ बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत धुळे संघाला पराभूत केले. मुलांच्या गटात मात्र पुणे संघाला नागपूरकडून पराभवाचा सामना करावा लागला.
पुणे जिल्हा बास्केटबॉल संघटनेच्या वतीने इंदिरा नॅशनल स्कूलच्या कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात पुणे संघाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत धुळे संघाला ६६-४६ गुणांनी नमविले. पुणे संघाच्या मुलींनी सुरुवातीपासून नियोजनबद्ध खेळ केला. इशा घारपुरे (१६), सई जगताप (१५) आणि सुधीक्षा नायरने (११) यांनी उत्कृष्ट ड्रिबलिंग, पासिंग करून धुळ्याच्या मुलींचा पराभव केला. परागू धुळे संघाकडून वैष्णवी हजारेने ८ आणि परिधी भागवतने ५ गुण केले. पुण्याच्या मुलींनी आपल्या गटातील तीन सामने जिंकले असून ६ गुणांसह त्या गटात आघाडीवर आहेत.
मुलांच्या गटात पुणे संघाला मात्र नागपूरच्या मुलांकडून पराभव स्वीकारावा लागला. नागपूर संघाकडून सिद्धेश कुलकर्णीने १९ व समित जोशीने १५ गुण केले. पुणे संघाकडून यश पागरेने ९ गुण केले.
निकाल : मुली : पुणे : ६६ गुण (इशा घारपुरे १६, सई जगताप १५, सुधीक्षा नायर ११) वि. वि. धुळे : ४६ गुण (वैष्णवी हजारे ८, परिधी भागवत ५); औरंगाबाद : ५४ गुण (खुशी डोंगरे १७, संजना जे. १६) वि. वि. मुंबई साऊथ ईस्ट : ६ गुण (श्रीनिधी आनंद ६); नाशिक : ५१ गुण (राधा हरदास १४, प्राची जाधव १२) वि. वि. मुंबई साऊथ वेस्ट : ३१ गुण (अस्ति नारवेकर १५); मुळे : औरंगाबाद ७१ गुण (प्रेम मिश्रा १९, प्रणय वसैया १९) वि. वि. मुंबई साउथ ईस्ट : ६३ गुण (नेहाल शेख २३, नौशरत शेख २१); नागपूर : ६८ गुण (सिद्धेश कुलकर्णी १९, समित जोशी १५) वि. वि. पुणे ४१ गुण (यश पागरे ९) ५); चंद्रपूर : ८१ गुण (हर्षल मारोटे १८, हिमांशू गायकवाड १४) वि. वि. रत्नागिरी : ७५ गुण (भानेश मनोज २२, सुयोग महाले १९).

Web Title: Dhule defeated from Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.