धुमाळ, नीरज, नरेंद्र, विजय उपांत्य फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:16 AM2021-02-18T04:16:24+5:302021-02-18T04:16:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : तिसऱ्या ‘सोलारीस करंडक’ वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या ३५ वर्षांखालील गटात पुण्याच्या केतन धुमाळ, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : तिसऱ्या ‘सोलारीस करंडक’ वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या ३५ वर्षांखालील गटात पुण्याच्या केतन धुमाळ, नीरज आनंद यांच्यासह नरेंद्र सिंग, विजय आनंद यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
सोलारीस क्लब, मयूर कॉलनी येथे आणि डेक्कन जिमखाना क्लब येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या ३५ वर्षांवरील गटात पुण्याच्या केतन धुमाळ याने मंदार वाकणकर याचा ६-१, ६-२ असा सहज पराभव केला. काल अग्रमानांकित खेळाडूला पराभवाचा धक्का देणाऱ्या नीरज आनंदने विजयी घोडदौड कायम ठेवत विवेक खाडगेचा ६-२, ६-१ असा पराभव केला. नरेंद्र सिंग याने नानू मंगेलाचा ६-०, ६-२ असा तर विजय आनंदने संदीप पवारचा ७-५, ६-३ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
४५ वर्षांवरील गटात अव्वल मानांकित नितीन कीर्तने याने रमेश डिसूझाचा ६-०, ६-० असा तर, केतन बेडेकरने दिलीप कुमार याचा ६-१, ६-३ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. सुनील लुल्ला याने सुब्रमण्यमचा ६-२, ६-१ असा तर, नीलकंठ डाबरे याने सतीश बाबू याचा ६-४, ६-२ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
५५ वर्षावरील गटात पुण्याच्या अजय कामत याने रफिक कोटा याचा ६-२, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. एस. शंकर याने अजित भारद्वाज याचा ६-३, ६-४ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. निर्मल कुमार याने सुनिल बर्वे याचा ६-२, ६-२ असा तर, मेहर प्रकाश याने रविंद्र नगरकर याचा ६-४, ६-२ असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
उपांत्यपूर्व फेरीचे निकाल
७० वर्षांवरील गट
डी. एस. रामा राव वि.वि. धवल पटेल ६-३, ६-२; श्रीकांत पारेख वि.वि. अजित पेंढारकर ६-३, ६-४;
गंगाधरन एस. वि.वि. ताहीर अली ६-१, ६-१; पद्मालू वि.वि. रूमी प्रिंटर ६-३, ६-२
६५ वर्षांवरील गट
अनुप डे वि.वि. सागर इंजीनिअर ६-३, ६-४;
अब्दुल हनिफ वि.वि. अशोक चावला ७-५, ६-१; एम. सुरेश वि.वि. महेंद्र कक्कड ६-२, ६-२
५५ वर्षांवरील गट
अजय कामत वि.वि. रफिक कोटा ६-२, ६-२; एस. शंकर वि.वि. अजित भारद्वाज ६-३, ६-४;
निर्मल कुमार वि.वि. सुनील बर्वे ६-२, ६-२; मेहर प्रकाश वि.वि. रवींद्र नगरकर ६-४, ६-२
४५ वर्षावरील गटः
नितीन किर्तने वि.वि. रमेश डिसूझा ६-०, ६-०; केतन बेडेकर वि.वि. दिलीप कुमार ६-१, ६-३;
सुनिल लुल्ला वि.वि. सुब्रमण्यम ६-२, ६-१; नीलकंठ डाबरे वि.वि. सतीश बाबू ६-४, ६-२;
३५ वर्षांवरील गटः
केतन धुमाळ वि.वि. मंदार वाकणकर ६-१, ६-२; नीरज आनंद वि.वि. विवेक खाडगे ६-२, ६-१;
नरेंद्र सिंग वि.वि. नानू मंगेला ६-०, ६-२; विजय आनंद वि.वि. संदीप पवार ७-५, ६-३;