मुलांमधील मधुमेहाची वाढ चिंताजनक

By Admin | Published: November 14, 2014 12:52 AM2014-11-14T00:52:42+5:302014-11-14T00:52:42+5:30

गेल्या काही वर्षात मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. ही बाब आता आश्चर्याची राहिलेली नाही.

Diabetes mellitus in children is worrisome | मुलांमधील मधुमेहाची वाढ चिंताजनक

मुलांमधील मधुमेहाची वाढ चिंताजनक

googlenewsNext
>पुणो : गेल्या काही वर्षात मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. ही बाब आता आश्चर्याची राहिलेली नाही. मात्र, बालकांमधील मधुमेहाचे प्रमाण चिंताजनकपणो वाढत असून, बदलती जीवनशैली हेच त्यामागील प्रमुख कारण असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांनी काढला आहे. ‘ज्युवेनाईल डायबेटिस रिसर्च फांऊडेशन’ने केलेल्या सव्रेक्षणात सध्या देशात 1क् लाख बालकांना टाईप 1 प्रकारचा मधुमेह असल्याचे निष्पन्न झाले आहे.
बालरोगतज्ज्ञ डॉ. सुप्रिया फणसे यांनी ही माहिती दिली. 14 नोव्हेंबर हा देशभरात बालदिन म्हणून साजरा केला जातो. त्याच वेळी जगभरात मधुमेह दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मधुमेह हा मध्यमवयीन किंवा प्रौढांमध्ये आढळणारा आजार असल्याचे मानले जात होते. मात्र, हा आजार बालकांमध्येही दिसून येत आहे. त्याचे प्रमाणही वाढले आहे.  (प्रतिनिधी)
 
मुलांमधील मधुमेहामध्ये मुलांच्या शरीरात इन्सुलिनची निर्मिती होत नाही, त्यामुळे या आजारावरील उपचारांसाठी त्यांना बाहेरून इन्सुलिन घेण्याची गरज असते. त्यामुळे बालकांच्या रक्तातील साखरेच्या पातळीची नियमित तपासणी करणो गरजेचे असते. बालकांमधील मधुमेह हा मुख्यत्वे अनुवांशिक मानला जातो. मात्र, आहारामध्ये कॅ लरीजचा अतिवापर, साधी साखर, आहाराच्या चुकीच्या सवयी, बदलती जीवनशैली ही कारणोही यामागे आहेत.
- डॉ. सुप्रिया फणसे,
 बालरोगतज्ज्ञ.
 
1 मधुमेह झाल्याचे समजल्यानंतर रूग्णाच्या डोळ्यांसमोर आपले भविष्य अनारोग्यातच काढावे लागणार याची प्रथमच जाणीव होते. या आजाराबरोबर जगणोही अनेकांना नकोसे होऊन जाते. मात्र, भारतीय रूग्णांची मानसिकता लक्षात घेऊन स्थापन करण्यात आलेल्या मधुमेह क्लबमधून अनेकांना आपल्या दु:खाचा विसर पडत आहे. सुमारे पाच हजार सदस्य असलेल्या या क्लबतर्फे अनेक उपक्र म राबविण्यात आहेत.
2यासंदर्भात, मधुमेहतज्ज्ञ डॉ. संजय गांधी यांनी माहिती दिली. मधुमेहांच्या रूग्णांची आकडेवारी दरवर्षी प्रसिद्ध होते. मात्र, त्यावर उपाययोजना किंवा प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने सरकारी पातळीवर कोणतेही कार्यक्र म नाहीत. नव्या औषधांची आणि परदेशात होणा:या संशोधनांचीही आपल्याकडे माहिती नाही. त्यामुळेच ‘एवनसी’ या क्लबच्या माध्यमातून मधुमेही रू ग्णांचे नियमितपणो परीक्षण करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. त्याचबरोबर मधुमेह क्लबमधून ‘डॉक्टरांबरोबर ब्रेकफास्ट ’ यासारख्या संकल्पनेतून रूग्णांना त्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी बदलण्यासाठी मदत करण्यात येते. बाजारात मिळणा:या कोणत्या पदार्थातून किती कॅलरीज मिळतील, याविषयी जनजागृती झाल्याशिवाय मधुमेहाचे प्रमाण आटोक्यात येणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Web Title: Diabetes mellitus in children is worrisome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.