साहित्यातून साधला जातो संवाद : कसबे
By admin | Published: November 13, 2014 12:28 AM2014-11-13T00:28:08+5:302014-11-13T00:28:08+5:30
जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे सांस्कृतिकीकरणावर आक्रमण होतेय. त्यामुळे भाषा नष्ट होण्याची भीती आहे. मराठी साहित्य अतिशय समृद्ध आहे.
Next
पुणो : जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे सांस्कृतिकीकरणावर आक्रमण होतेय. त्यामुळे भाषा नष्ट होण्याची भीती आहे. मराठी साहित्य अतिशय समृद्ध आहे. साहित्य म्हणजे माणसाने निसर्गाशी, स्वत:शी केलेला संवाद आहे आणि हा संवाद लेखकाने प्राप्त करणो ही त्याची तपश्चर्या आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. कसबे यांचा 7क्व्या वाढदिवसानिमित्त कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी चंद्रकांत शेवाळे, डॉ. कल्याणी दिवेकर उपस्थित होते.
कसबे म्हणाले, ‘‘साहित्य हे मानवी स्वरूपाचेच असते; परंतु साहित्यिक हा जातीपातीच्या विळख्यात अडकतो. सध्याच्या युगात नव्या भांडवलशाहीचा उदय झाला आहे. माणसाला जुन्या गोष्टी सोडवत नसल्याने तो जागतिकीकरणाचा स्वीकार करत नाही. परिषदेचे कोषाध्यक्ष सुनील महाजन यांनी आभार मानले.
(प्रतिनिधी)