वळवाचा डाळिंब, आंब्याला फटका
By admin | Published: May 14, 2015 04:23 AM2015-05-14T04:23:24+5:302015-05-14T04:23:24+5:30
खळद परिसरातील खळद, शिवरी, वाळुंज, निळुंजसह परिसरातील गावांना वादळी वाऱ्यासह पावसाने प्रचंड झोडपले. या वेळी डाळींब, आंब्यासह
खळद : खळद परिसरातील खळद, शिवरी, वाळुंज, निळुंजसह परिसरातील गावांना वादळी वाऱ्यासह पावसाने प्रचंड झोडपले. या वेळी डाळींब, आंब्यासह फळबागांना मोठा फटका बसला.
सर्व परिसर जलमय झाला होता. सर्व शिवारात, फळबागांमध्ये पाणी साचले होते. वाऱ्याचा वेगही इतका प्रचंड होता, की परिसरात अनेकांच्या घराच्या छतावरील पत्रे उडाले, भिंती पडल्या, रस्त्यावरील रसवंती गृहावरील नेट उडून गेल्या, फळबागांमध्ये फळगळतीबरोबर झाडेही उन्मळून पडत हाहाकार झाला. गरु वाळुंज येथे शेतकरी नितीन इंगळे यांनी डाळींबाची झाडे उन्मळून पडल्याचे सांगत मोठ्या प्रमाणावर फळगळती झाल्याचे सांगितले. खळदला आंबा पिकाची फळगळती झाली. तसेच रामचंद्र महादेव इंगळे, शांताराम महादेव इंगळे, सत्यवान शिवाजी इंगळे, रघुनाथ विठ्ठल इंगळे, धनंजय जयप्रकाश बनकर यांच्यासह अनेकांच्या घराच्या छतावरील पत्रे उडाल्याचे, भिंती पडल्याची प्राथमिक माहिती मिळाली.
वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी कनिष्ठ अभियंता संदीप काकडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने वीजपुरवठा सुरळीत केला. (वार्ताहर)