बंदीच्या विरोधात डीजेवाल्यांचा ‘आवाज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 05:24 AM2018-09-17T05:24:39+5:302018-09-17T05:24:56+5:30
उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या निषेधार्थ शहरातील डॉल्बी व डीजे साऊंड सिस्टीम व्यावसायिकांनी रविवारी बालगंधर्व चौकात आंदोलन केले.
पुणे : उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या निषेधार्थ शहरातील डॉल्बी व डीजे साऊंड सिस्टीम व्यावसायिकांनी रविवारी बालगंधर्व चौकात आंदोलन केले. न्यायालयाच्या निर्णयामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, असे म्हणत सार्वजनिक गणेश उत्सव समिती आणि डॉल्बी, डीजे व्यावसायिकांनी निषेध व्यक्त केला.
उच्च न्यायायलायाने डॉल्बी, डीजेवर तूर्त बंदीचा आदेश दिला आहे. यावरुन डीजे व्यावसायिकांमध्ये नाराजी असून त्याच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या आंदोलनात डीजे चालक व साऊंड सिस्टीम व्यावसायिक सहभागी झाले होते. पुणे शहरात दोन ते अडीच हजार मराठी तरुण डॉल्बी, डीजेचा व्यावसाय करतात. डॉल्बी, डीजेवर बंदी घालण्याबाबत या व्यावसायिकांशी कोणतीही चर्चा न करता हा निर्णय देणे चुकीचे आहे. या निर्णयामुळे हजारो तरुणांवर उपासमारीची वेळ येणार आहे. सरकारने त्वरीत या प्रश्नावर तोडगा काढावा, असे समितीचे प्रवीण डोंगरे यांनी
सांगितले.